सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मान्यवरांनी केले आदिवासींच्या रानभाज्या प्रदर्शनाचे कौतुक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींना रोजगार

Aishwarya Dubey
  • Aug 12 2020 11:47AM
पालघर  :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार कृषी मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादासाहेब भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासींना रोजगार निर्मिती व्हावी व राणभाज्यांचे महत्त्व व परिचय जनतेला व्हावा यासाठी राणभाज्यांचे आयोजित करण्यात आलेल्या रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आज मान्यवरांच्या हस्ते  उद्घाटन झाले.कोसबाड हिल येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
यावेळी मान्यवरांनी रानभाज्या महोत्सवात ठेवल्या रानभाज्या  प्रदर्शन व पाककृती स्पर्धाची  पाहणी केली.
निसर्गात उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या, शरीरात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी रानभाज्या शरिराला आवश्यक आहेत. असे प्रतिपादन यावेळी खा.राजेंद्र गावित यांनी केले.
तर आ.विनोद निकोले यांनी शरिर सदृढ ठेवण्यासाठी रानभाज्या आवश्यक आहेत. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
रानभाज्या औषधी वनस्पती असून प्रत्येकाने राणभाज्यांचे सेवन केले पाहिजे असे उद्गार यावेळी आ. श्रीनिवास वनगा यांनी काढले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांनी आदिवासींच्या प्रदर्शनाची प्रशंसा करून अशा कार्यक्रमासाठी आदिवासींना जिल्हा प्रशासनातर्फे प्रोत्साहन दिले जाईल असे सांगितले.
रानभाज्याचे ४० स्टॉल तर पाककृती स्पर्धाचे १७ स्टॉल  सदर महोत्सवात ठेवण्यात आले होते. सदर महोत्सवात भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांमधून तीन क्रमांकापर्यंत बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर कार्यक्रमात विकास पाटील, विभागीय कृषी सहसंचालक कोकण विभाग, के.बी.तरकसे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पालघर,डॉ. विलास जाधव वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कषि विज्ञान केद्र कोसबाड ,सामजिक कार्यकर्ते जगन्नाथ हिलीम उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार