सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना पुन्हा एकदा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून टीका केल्यानंतर कंगनाने जोरदार पलटवार केला आहे

Aishwarya Dubey
  • Oct 26 2020 3:16PM

शिवसेना विरुद्ध कंगना रणौत सामना पुन्हा एकदा रंगला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून टीका केल्यानंतर कंगनाने जोरदार पलटवार केला आहे.  'तुम्ही जनतेचे सेवक आहात, सत्ता येत असते आणि जात असते, पण सन्मान एकदा गेल्यावर तो परत मिळत नाही, असं म्हणत कंगनाने पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

कंगना रणौतने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडीओ प्रसिद्ध करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मला शिवी दिली. मला नमकहराम म्हटले आहे. याआधीही शिवसेनेच्या नेत्यांनी तोंड फोडणे आणि मारहाण करणार, अशी भाषा वापरली आहे.  पण तुम्ही आपल्या भाषणामध्ये हिमाचलबद्दल ज्याला देवभूमी म्हटले जाते, त्याबद्दल अत्यंत वाईट भाषा वापरून महाराष्ट्राच्या मान शरमेनं झुकवली आहे. आपण मुख्यमंत्री असून असे वक्तव्य केले आहे', अशी टीका कंगनाने केली

तसंच, 'मुख्यमंत्री ठाकरे हे देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना महाराष्ट्राचे ठेकेदार कुणी बनवले? तुम्ही आज जनतेचे सेवक आहात, याच्या आधी या खुर्चीवर कुणी तरी होतं. तुमच्यानंतरही या खुर्चीवर कुणी तरी बसेल. पण तुम्ही महाराष्ट्र स्वत: च्या मालकीचा असल्यासारखं का वागताय? असा सवालही कंगनाने केला होता.

 
 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार