सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला

तरुणांनो तयारीला लागा.. वर्षाखेरीपर्यंत होणार मेगा भरती

Aishwarya Dubey
  • Jul 18 2020 2:32PM

राज्यात करोनामुळे नोकरी आणि रोजगाराच्या संधी कमी होत असताना ठाकरे सरकारनं राज्यातील पोलीस भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरुणासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२० पर्यंत राज्य पोलीस दलांमध्ये विविध पदांवर १२ हजार ५३८ कर्मचाऱ्यांची भर्ती केली जाणार आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवर दिली आहे.

गृहमंत्र्यांनी या संदर्भात शुक्रवारी गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह घेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत गृह विभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे,पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता.

आता करोनाचा प्रादुर्भाव असतानाही गृहमंत्र्यांनी भरती घेण्यासाठी पावले उचलली आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार