सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एसबीआय लोणारच्या पीककर्ज वाटपाने शेतकरी राजा आनंदित

राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत लोणार तालुक्यातील बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त झाले असून एसबीआय लोणार बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.

योगेश शर्मा
  • Jun 16 2020 8:51AM
बुलढाणा : राज्य शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेअंतर्गत लोणार तालुक्यातील बहुतांशी शेतकरी कर्जमुक्त झाले असून  एसबीआय लोणार बँकेच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या गावात जाऊन पिक कर्ज वाटप करण्यात आले आहे.
या योजनेचा लाभ मिळालेल्या अजीसपूर, खुरामपूर, देऊळगाव कुंडपाळ, किन्ही, मातमळ, सरस्वती, शारा, कुंडलस, पिंपळनेर, जांबूल, देऊळगाव वायसा, गोत्रा, गंधारी,, रायगाव, सावरगाव मुंढे, टिटवी, धाड, पांगरा डोळे,  कोयाळी या गावात जाऊन शेतकऱ्यांकडून पीककर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्राची पूर्तता करून घेऊन  शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 
एसबीआय बँकेच्या लोणार शाखेमध्ये दिनांक १२ जून पर्यंत १२१९ शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी अर्ज दाखल केलेले असून त्यापैकी ८०७ शेतकऱ्यांचे पीककर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ५२९ शेतकऱ्यांना बँकेने ४कोटी ६ लाख रुपये पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. उर्वरित शेतकऱ्यांना लवकरच पीककर्ज वाटप करण्याचा आमचा मानस असल्याचे  क्षेत्र अधिकारी (कृषी ) गजानन देवरे  यांनी दिव्य मराठी शी बोलतांना सांगितले आहे. राज्यशासनाची हि योजना बँकेचे  अधिकारी गजानन देवरे, अमोल सुरवसे, कर्मचारी निरज राउत, अमोल भटकर, अक्षय मानकर, वैशाली भैसारे यांनी शेतकऱ्यांच्या दारात पोहचवली असून यांना मनीष शिंदे, गजानन बगाडे, दर्शन शर्मा, सुनील मोरे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे.  घरपोच पीककर्ज वाटपामुळे एसबीआय बँकेच्या लोणार शाखेच्या परिसरातील शेतकरी राजा आनंदित झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार