सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचा करोनामुळे मृत्यू

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा रविवारी सकाळी करोनामुळे मृत्यू झाला.

Aishwarya Dubey
  • Jun 14 2020 2:20PM

सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी आमदाराचा रविवारी सकाळी करोनामुळे मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निष्ठावंत अनुयायी मानले जात होते. शिवाय ते पन्नास वर्षे राजकारणात सक्रिय होते.

दोन दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे एका खासगी रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची करोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. वृद्धत्व, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळू शकला नाही. अखेर रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांचे निधन झाले.

१९६९, १९७४ आणि १९९५ अशा तीन वेळा सोलापूर महापालिकेवर ते निवडून गेले होते. १९७४-७५ साली त्यांनी महापौरपदाची जबाबदारी सांभाळली होती. शहरातील शरद पवार यांच्या राजकारणाची सूत्रे एकेकाळी त्यांनीच हाताळली होती. विशेषतः महापालिकेचा कारभार त्यांच्याच हाती एकवटला होता. १९९२ साली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना विधान परिषदेवर बिनविरोध निवडून पाठविण्यात आले होते. मात्र दुसऱ्यांदा १९९७ साली त्यांना पराभव पत्करावा लागला होता. अखेरपर्यंत त्यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार