सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपाचे माजी आमदार यांच्या मुलाचा परभणीत शुक्रवारी अपघाती मृत्यू

महागड्या दुचाकीचा चुराडा

Aishwarya Dubey
  • Jul 11 2020 12:59PM

भाजपाचे माजी आमदार मोहन फड यांच्या मुलाचा परभणीत शुक्रवारी अपघाती मृत्यू झाला आहे. परभणी शहरातील उड्डाणपुलावर मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड याच्या दुचाकीचा अपघातात झाला. अपघातानंतर पृथ्वीराजला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पृथ्वीराज याच्या मृत्यूमुळे फड यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

माजी आमदार मोहन फड यांचा मुलगा पृथ्वीराज फड मुंबईमध्ये शिक्षण घेत होता. राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर झाला आहे. त्यामुळे पृथ्वीराज मुंबईहून परभणीला आला होता. शुक्रवारी संध्याकाळी तो आपल्या डुकाटी स्क्रम्बलर (ducati scrambler) बाइकवरून गंगाखेड रस्त्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी उड्डाणपुलावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.

पृथ्वीराजची दुचाकीचा पुढील बाजूने पूर्णपणे चकनाचुर झाला आहे. हा एवढा गंभीर अपघात नेमका कुठल्या वाहनाबरोबर झाला हे मात्र कुणालाही कळु शकले नाही. कारण घटनास्थळी केवळ दुचाकींच पडलेली होती. त्यामुळे त्या वाहनाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार