सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवार हे माझ्या वडिलांसारखे – फडणवीस

फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

Aishwarya Dubey
  • Jun 11 2020 10:40AM

‘राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे म्हणाले ते मी ऐकलं, मी विदर्भातील आहे त्यामुळे समुद्राची पाहणी करायला चाललो आहे असे ते म्हणाले, पण मी अनेकदा बारामतीत गेलो, तिथे मला समुद्र दिसला नाही. शरद पवार हे माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. माझे वडिल असते तर त्याच वयाचे असते. त्यामुळे मुलगा किती पुढे गेला तरी बापाला असं वाटतं की त्याला कमी समजतं. त्या भावनेतून शरद पवार बोलले असतील. त्याहीपेक्षा मला असं वाटतेय की माझ्या खांद्यावरून, शरद पवार यांना बांद्रयाच्या सिनिअर आणि बारामतीच्या ज्युनिअरवर बंदूक चालवायची आहे. आणि त्यांना सांगायचेय की बाबांनो काहीतरी करा..अशी टीका शरद पवार यांच्यावर फडणवीस यांनी केली आहे.’

कोकण दौऱ्याच्या सुरूवातीला पत्रकारांशी ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे ११ आणि १२ जून असे दोन दिवस कोकणाचा दौरा करणार आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौरा केला आहे. “मी बारामतीसारख्या दुष्काळी भागातून येतो. देवेंद्र फडणवीस विदर्भातून येतात. समुद्राशी काहीही संबंध नाही. त्यामुळे ते येत आहेत तर चांगलं आहे. प्रत्येकाला ही परिस्थिती समजेल, ज्ञानात भर पडेल.” असं म्हणत शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. या टीकेला आता फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पुन्हा एकदा फडणवीस आणि पवार या दोन नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगल्याचे चित्र आहे.

यावेळी बोलताना राज्य सरकारने कोकणसाठी दिलेली मदत तोकडी असल्याचं वक्तव्यही त्यांनी केलं. ते म्हणाले की, ‘चक्रिवादळात फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे, त्यामुळे झाडांचा विचार करुन आपल्याला नुकसान भरपाई द्यावी लागेल, १५ हजार रोख द्या अशी मागणी केली होती, ती सरकारने मान्य केलेली नाही. तसेच भांड्यांसाठीही अत्यंत तोकडी मदत केली आहे.’ अनेक गोष्टींचे नुकसान झाले आहे, कोकणासाठी किमान सात ते साडेसात कोटीचं पॅकेज द्यावं लागेल, तरच कोकण परत उभं राहिलं, असेही ते म्हणाले.

असा आहे दोन दिवसांचा दौरा –
दि. ११ जून रोजी रायगड जिल्ह्यातील रेवदंडा, चोल, काशिद, राजपुरी, आगरदंडा, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन इत्यादी ठिकाणी ते भेटी देतील, तर दि. १२ जून रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास, केळशी, अंजर्ले, पाजपांढरी आणि दापोली येथे भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील आणि स्थानिकांशी संवाद साधतील.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार