सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिक्षण अधिकाऱ्यांनी एकेरी उल्लेख करुन अरेरावीपूर्ण उत्तरे दिल्याने शिवसैनिक संतप्त

निवेदन देण्यासाठी गेलेले पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मंगळवारी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांच्या दालनात गोंधळ घातला. शिक्षण अधिकाऱ्यांच्या मेजावरील कागदपत्रांची फेकाफेक करीत अंगावर धावून जात कठोर शब्दांत सुनावले

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 24 2020 9:10AM
 

निवेदन देण्यासाठी गेलेले पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मंगळवारी धुळे जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांच्या दालनात गोंधळ घातला. शिक्षण अधिकाऱ्यांच्या मेजावरील कागदपत्रांची फेकाफेक करीत अंगावर धावून जात कठोर शब्दांत सुनावले. मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शिक्षण अधिकाऱ्यांनी एकेरी उल्लेख करुन अरेरावीपूर्ण उत्तरे दिल्याने शिवसैनिक संतप्त झाल्याचा दावा माजी जिल्हाप्रमुख भुपेंद्र लहामगे यांनी केला.

सध्या करोना संकटामुळे शालेय प्रवेश प्रक्रिया आणि एकूणच शैक्षणिक कामकाज खोळबंले आहे. त्यातच आता काही संस्थांमध्ये शाळा, महाविद्यालयीन प्रवेश सुरु करण्यात आले आहेत.

संस्थाचालक शाळा प्रवेशांसाठी वारेमाप देणगीची मागणी करीत आहेत, अनेक इंग्रजी शाळा शुल्क वसूल करुन पालकांना वेठीस धरत आहेत. अशा संस्थाचालकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शिवसेनेचे पदाधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुभाष बोरसे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. बोरसे हे कार्यालयात काही वेळाने आले.

निवेदन देतांना झालेल्या चर्चेवेळी शिवसेना पदाधिकारी आणि बोरसे यांच्यात शाब्दीक वाद झाला. सेना पदाधिकाऱ्यांनी शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड यांच्याकडे तुमची तक्रार करू, असा इशारा दिला असता शिक्षण अधिकाऱ्यांनी अनुचित उत्तर दिल्याने पदाधिकाऱ्यांचा पारा चढला. त्यांनी गोंधळ घातला. मंचावरील कागदपत्रांची फेकाफेक करीत काही जण धावून गेले.

याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख लहामगे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. धुळ्यातील काही संस्थाचालक माणुसकी विसरून सक्तीने शुल्क वसूल करीत आहेत. प्रवेशासाठी देणगी मागत आहेत. अशा संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेलो होतो. परंतु, त्यांनी सौजन्य न दाखविता अरेरावी केली.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल एकेरी भाषा वापरली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाल्याचे लहामगे यांनी सांगितले. ज्या पालकांना शाळांमधून शुल्क वसुली आणि देणगीची मागणी करीत अडवणूक केली जात असेल, त्यांनी शिवसेनेकडे तक्रार करावी. आम्ही कारवाई करण्यास भाग पाडू, असे आवाहन लहामगे यांनी केले.

याप्रसंगी महानगर प्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम जाधव, रामदास कानकाटे आदी उपस्थित होते.

माझी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरु होती. परंतु, शिवसेनेचे पदाधिकारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंविरुध्द मी अपशब्द वापरलेला नाही. शिवसेनेचे कार्यकर्ते ते वाक्य माझ्या तोंडी घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मला मुख्यमंत्र्यांविषयी आदर आहे. ते सन्मानीय व्यक्ती आहेत. मीही त्यांचा चाहता आहे. झालेल्या प्रकाराबद्दल कायदेशीर कार्यवाही करण्याविषयी वरिष्ठांशी चर्चा करुन निर्णय घेईल

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार