सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला

लडाखच्या गलवाण खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे

Aishwarya Dubey
  • Jun 18 2020 10:56AM

लडाखच्या गलवाण खोऱ्यात भारत-चीन सैन्यात झालेल्या संघर्षानंतर आता देशभरात चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरु लागली आहे.राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

“आत्मनिरर्भरच्या गप्पा मारुन झाल्यानंतर भारतीय कंपनीला डावलून मीरत मेट्रोचं कॉन्ट्रॅक्ट चिनी कंपनीला देण्यात आलं. कोणी दिलं हे कॉन्ट्रॅक्ट? रेल्वे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्राच्या ना? त्यानंतर 15 जूनला चिन्यांनी आपल्या 20 जवानांना मारले. हे कसले बोंबलाचे परराष्ट्र धोरण?”, अशी टीका आव्हाड यांनी ट्विटरद्वारे केली. तसेच, “12 जूनला दिल्ली मेरठ मेट्रोच्या कामात एल&टी या भारतीय कंपनीलाला डावलून चिनी ‘शांघाय टनेल इंजिनिअरिंग कंपनी’ला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट आधी रद्द करायला सांगा”, असंही आव्हाड म्हणाले.

 

यापूर्वीही आव्हाड यांनी, “चीनने भारताच्या भूमीत घुसून आपल्या सैनिकांना मारलं आहे. अशावेळी चीनला धडा शिकवला पाहिजे. मोदींसोबत संपूर्ण देश आहे. आता मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे. झोपाळ्यावर बसून झालं. आता चीनकडे “लाल आंखे” करून पहायची वेळ आली आहे. काय म्हणता?” असं ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार