सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला

हे उशिरा सुचलेलं शहाणपण, कदम यांनी साधला निशाणा

Aishwarya Dubey
  • Jun 8 2020 12:44PM

“भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनू सूदला दत्तक घेतले. त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे ‘महात्मा’ सूद याने दाखवून दिले,” अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर रविवारी रात्री सोनू सूदनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. “अखेर सोनू सूद महाशयांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा पत्ता सापडला,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं. यावरून आता भाजपा नेते राम कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.

” हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सारवासारव करण्यासाठी बोलावून घ्यायचं, उताणे पडल्यावर सुद्धा पाहा आमचे पाय वरच आहेत असे दाखवण्याचा साळसूदपणा करायचा? तुम्ही सरकार म्हणून कमी पडलात म्हणूनच त्याला रस्त्यावर उतरावे लागले हे मान्य करण्याचा मोठेपणा कधी येणार?,” असा सवाल राम कदम यांनी केला आहे. त्यांनी ट्विटरवरून राऊत आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.

 

काल सोनू सूदनं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

लॉकडाउनमुळं मुंबईत अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचं काम करणारा अभिनेता सोनू सूद याला राजकारण्यांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोनूच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. या पार्श्वभूमीवर सोनू सूदने रविवारी रात्री ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, आमच्यात कोणतेही मतभेद नसल्याचं त्यानं या भेटीनंतर म्हटलं होतं. “स्थलांतरीत मजूर आणि माझं नातं खूप वर्षांपासूनचं आहे. स्थलांतरीत मजुरांसाठी केलेलं कार्य फक्त एका राज्यापुरतं मर्यादित नाही. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत ज्याने मला मदतीसाठी बोलावले त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला. प्रत्येक राज्याच्या सरकारने माझ्या या कामात सहकार्य केलं,” अशी प्रतिक्रिया त्यानं भेटीपूर्वी ट्विटरवरून दिली होती.

 

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार