सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बाळा नांदगावकरांची राज ठाकरेंसाठी खास फेसबुक पोस्ट

"योगायोग असा की, साहेबांच्या निवासस्थानाचे नावसुद्धा 'कृष्णकुंज'च आहे"

Aishwarya Dubey
  • Jun 14 2020 2:15PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करोनाच्या संकटामुळे राज ठाकरे यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भेटायला न येण्याचं आवाहन यापूर्वीच केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे अनेक राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी ओळख असलेले मनसे नेता बाळा नांदगावकर यांनीही राज ठाकरे यांच्यासाठी एक खास फेसबुक पोस्ट लिहून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “सुदामाचे राजधन” या शिर्षकाखाली नांदगावकर यांनी खास फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

“सुदामाची ओळख ही जगाला कृष्णप्रेमामुळे आहे, सुदामा आणि कृष्णाच्या मैत्रीचे दाखले हे हजारो वर्षे झाली तरी सातत्याने लोक अजूनही देत असतात. सुदामाकडे निखळ प्रेमाशिवाय कृष्णाला देण्यासारखे काहीच नव्हते, तरीसुद्धा भगवान कृष्णाचे सुदामा प्रेम हे सगळ्यात जास्त होते. मी सुद्धा आज राजकीय, सामाजिक, वैयक्तिक आयुष्यात जे काही आहे ते साहेबांमुळेच, माझ्याकडे सुद्धा साहेबांना देण्यासारखे म्हणजे माझी “निष्ठा” जी मी कधीच अर्पण केली आहे. मला खुप आनंद आहे की माझी सर्वात मोठी ओळख “राजनिष्ठ” अशीच आहे. साहेबांचा लाभलेला अनेक दशकांचा सहवास, वेळोवेळी त्यांनी दिलेले प्रेम, त्यांनी दाखवलेला मार्ग, या सर्व गोष्टी म्हणजे माझ्यासारख्या सुदामाचे “राजधन”. योगायोग असा ही आहे की साहेबांच्या निवासस्थानाचे नाव सुद्धा “कृष्णकुंज”च आहे. या लॉकडाउनमुळे साहेबांना या दिवशी राज्यभरातून शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या हजारो लोकांची या वर्षी ही प्रेमळ भेट होणार नाही व त्यामुळे सर्वांच्या मनात या वर्षी एकच ओळ नक्की असणार आहे…” साहेबा प्राण तळमळला”…पण हा दुरावा तात्पुरता असून साहेब आणि आपण सर्वजण मिळून लवकरच मार्गक्रमण करून जनतेच्या हिताचे काम करू. आज साहेबांच्या जन्मदिनी मी एकच सांगेन….”तुम्हे और क्या दू मै दिल के सिवाय, तुमको हमारी उमर लग जाए”, अशी पोस्ट नांदगावकर यांनी राज ठाकरेंसाठी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार