सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

या वेळी काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांची रांग लागली होती.

Aishwarya Dubey
  • Jun 5 2020 10:10AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील तलासरी तालुक्यातील सावरोली हद्दीत गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर लग्झरी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पिकअपमधील तिघांचा जागीच मृत्य झाला. पाच किरकोळ जखमी झाले आहेत.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सावरोली हद्दीत काठय़ावाडी हॉटेलसमोर बुधवारी  गुजरातवरून मुंबईकडे जाणारी मालवाहू पिकअप गाडी भरधाव जात असताना चालकांचा ताबा सुटल्याने पलटी होऊन डिव्हायडरवर चढून विरुद्ध दिशेने गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर जाऊन हिंदुस्थान पेन्सिल कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाऱ्या लग्झरी  बसला धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील चालकासह त्याचे दोन सहकारी असे तिघांचा दुर्दैवी जागीच मृत्यू झाले. हे तिघेही तरुण मुंबईचे असून त्यांची नावे समजू शकली नाही.  तर लग्झरी बसमधील तीन कामगार किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातावेळी एक स्कुटीही मध्ये आली होती. त्या स्कुटीवरील दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तलासरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सदर अपघात एवढा भीषण होता की, अपघातात पिकअपमध्ये अडकलेल्या तरुणांचे मृतदेह काढण्यासाठी क्रेन लावून दरवाजे तोडून बाहेर काढण्यात आले. या वेळी काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांची रांग लागली होती. मात्र पोलिसांनी तातडीने अपघातातील वाहने महामार्गावरून बाजूला करून वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार