सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनात सरकारने केली महाआघाडीची सर्कस

कोरोनाचे संकट महा आघाडी सरकारचे अपयश आहे. महाआघाडी सरकारच्या कार्यप्रणालीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जोरदार प्रहार केला. सद्यः स्थिती पाहता महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का, की फक्त सर्कसच सुरू आहे असा सवाल संरक्षणमंत्र्यांनी केला

Snehal Joshi
  • Jun 10 2020 4:59PM
नागपूर  - कोरोनाचे संकट महा आघाडी सरकारचे  अपयश आहे.  महाआघाडी सरकारच्या  कार्यप्रणालीवर संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी जोरदार  प्रहार  केला. सद्यः स्थिती पाहता  महाराष्ट्रात सरकार अस्तित्वात आहे का, की फक्त सर्कसच सुरू आहे असा  सवाल संरक्षणमंत्र्यांनी केला
यावेळी त्यांनी स्थलांतरित कामगारांना मदत करणार्‍या अभिनेता सोनू सूदचे समर्थन आणि कौतुक केले. त्याच्यावर टीका करण्याचे काहीच कारण  खासदार संजय राऊत यांना नसताना, उद्धव ठाकरे यांचे सरकार मात्र अनावश्यक राजकारण करीत आहे, असे  टीका अस्त्र त्यांनी सोडले .

 राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासारखे बुद्धिचातुर्य असलेले, सक्षम नेतृत्व या  महान महाराष्ट्र राज्यात असताना अशा प्रकारची स्थिती व्हावी. असे राजनाथसिंह यांनी राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांशी आभासी सभेच्या माध्यमातून संवाद साधताना सांगितले.

सत्तेची भूक किती मोठी असते, याची प्रचिती  आपल्यालायाच  महाराष्ट्रात आली. सत्तेसाठी जुन्या मित्राशी विश्‍वासघात केला जातो. मैत्री, वचने  तोडली जातात. अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

चीनसोबतच्या सीमावादावरून राहुल गांधी यांनी एक शेर ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली होती.

सब को मालूम है
सीमा की हकीकत लेकिन
दिल के खुश रखने की,
शाह-मद ये ख्याल अच्छा है
याला राजनाथसिंह यांनी तितक्याच शायराना अंदाजात उत्तर दिले. आपल्या
ट्विटमध्ये ते म्हणतात,
हाथ में दर्द हो तो दवा कीजै,
हाथ ही जब दर्द हो ता क्या कीजै।

कोरोनाबाधितांना रुग्णवहिकेकरिता 16 ते 18 तास प्रतीक्षा करावी लागत आहे. हे चित्र अतिशय भीषण आहे. या राज्यात खरोखरच सरकार अस्तित्वात असते. तर हे भीषण दृश्य नसते. बाधितांनाच काय, कोरोना योद्ध्यांनाही रुग्णालयामध्ये  जागा दिल्या जात नाहीत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरप्रदेशचे तसेच कर्नाटकने कोरोनाला बर्‍यापैकी नियंत्रणात आणले आहे. या राज्यांपासून महाराष्ट्र सरकारने धडा घेण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात या दोन्ही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्या  फार जास्त होती. पण योग्य उपाययोजनांमुळे तिथे आज स्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लडाख सीमेवर अलिकडील काळात ज्या काही घडामोंडी घडल्या. त्यावर मी फक्त संसदेतच बोलणार आहे. भारताच्या राजनयिक आणि लष्करी पातळीवरील चर्चेमुळे आता सीमेवरील स्थिती पूर्णपणे आटोक्यात आहे. पण तरीही काँग्रेसचे  काही नेते राजकारण करीत आहे. आम्हाला कुणासोबतही संघर्ष करायचा नाही. शांततेच्या मार्गानेच सर्व वाद मिटवायचे आहेत. अशा शब्दात राजनाथसिंह यांनी राहूल गांधी यांना उत्तर दिले. आपला देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात  पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यांच्या नेतृत्वात नागरिकांनी मनात कुठलीही भीती बाळगू नये. आत्मसन्मान आणि देशाच्या गौरवाशी कुठलीही तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार