सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

धीर आणि मनोबल वाढविण्यासाठी वंदेमातरम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघा आणि राष्ट्र सेविका समितीचे अभिनव उपक्रम, एसटी बस स्थानकावर पाच दिवस मदत कार्य सुरू.

snehal joshi
  • May 17 2020 8:07PM

 संघ आणि समिती तसं बघितलं तर दोघांचाही उद्देश एकच राष्ट्रसेवा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती. कोरोनाचा 
महामारीत संकटाच्या काळात या दोन्ही राष्ट्रीय संस्था गणेश पेठ बस स्थानकावर मध्यप्रदेश छत्तीसगडला जा जाणाऱ्या कामगारांचे मनोबल उंचावण्यासाठी रोज सकाळी इतनी शक्ती हमे देना दाता ---- भारत माता की जय --- वंदे मातरम जय घोषाचा अभिनव उपक्रम  करीत आहेत.

 महाराष्ट्रात अडकलेल्या आणि आपल्या राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या तसेच या राज्यात, या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या मजूर, कामगार, विद्यार्थ्यांना  पर्यटकांसाठी राज्य सरकारने विशेष बससेवा सुरू केली आहे. नागपूर शहरांमध्ये गणेश पेठ बस स्थानक येथून या बसेस सोडण्यात येत आहे. मात्र मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जाणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिवहन आणि पोलिस विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे या कठीण प्रसंगांमध्ये परिवहन आणि पोलिस विभागाच्या  मदतीला11मे पासून  संघ आणि समिती चे स्वयंसेवक, सेविका यांनी पुढाकार घेतला.

 बस स्थानकावर येणाऱ्या कामगारांची आणि इतर नागरिकांची त्यांच्या राज्य व जिल्ह्यानुसार विभागणी करणे, त्यांचे वैद्यकीय चाचणी करणे, सर्वांना विटामिन सी, ओ आर एस डोज  आणि वेदनाशक औषधांचे वाटप करणे लहान मुलांच्या खाऊचे वाटप करणे , जेवणाची व्यवस्था इत्यादी महत्त्वाचे काम संघामार्फत केले जाते.
तर लहान मुलांचे  खाऊ वाटप, गर्भवती महिलांसाठी विशेष किट,  तरुण मुलींसाठी विशेष सोय,  अनवाणी  पायाने आलेल्या वयोवृद्ध आणि लहान मुलांना चप्पल देण्यात येत आहे.  तसेच प्रत्येक नागरिकांची नोंद करण्याचे काम समितीचा  सेविका करीत आहेत. 

 सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत संघा, समितीच्यावतीने वरील कार्य केले जात आहे. त्यामुळे परिवहन आणि पोलीस विभागाला त्यांच्या कामात मोठी मदत होते आहे. महत्त्वाचे म्हणजे सर्व स्वयंसेवक  मास्क आणि  
 सनिटायझर आणि भौतिक अंतर राखून मदत कार्य करीत आहे. यासाठी संघाने महानगर विद्यार्थी प्रमुख पंकज कोठारी,  इतवारी भाग विद्यार्थी प्रमुख अनुप घुमारे यांनी ही माहिती दिली. तर सेविका तन्वी कवीश्वर. साक्षी उराडे, शरयू रोकडे, अनघा डबरी यांनी  माहिती दिली

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार