सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

किल्ले शिवनेरीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज भेट देणार

किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून 3 तास ते गडावर असतील.

Aishwarya Dubey
  • Aug 16 2020 10:16AM

अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या शिवजन्मभूमीत अर्थात किल्ले शिवनेरीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज सकाळी भेट देणार आहेत. गेल्या दोन दशकांत प्रथमच राज्याचे राज्यपाल किल्ले शिवनेरीच्या भेटीला येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळी ते नतमस्तक होणार आहेत. सकाळी साडेदहा वाजता किल्ले शिवनेरीवरील पहिल्या दरवाजापासून ते संपूर्ण गडावर ते पायी फिरून पाहणी करणार असून 3 तास ते गडावर असतील.

राज्यपालांच्या किल्ले शिवनेरीवरील भेटीच्या शासकीय नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. सध्या पावसाचे वातावरण असल्याने गडावरील राज्यपालांच्या भेटीच्या दृष्टीने विशेष खबरदारी प्रशासन घेत आहे. पावसामुळे कोणत्याही प्रकारची अडथळा राज्यपालांच्या दौऱ्यात किल्ले पाहणीच्या वेळात येवू नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे.

गडावर बिबट्यांचा वावर असतो. या दृष्टीनेही खबरदारी घेण्यात यावी. झाडाझुडूपात हिंस्त्रपशू थांबणार नाहीत याची काळजी संबंधित विभागांनी घेऊन सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे निर्देश दौऱ्याच्या अनुषंगाने देण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रशासनाकडून या दौऱ्याचे नियोजन केले आहे.

गेल्या 20 वर्षांत राज्यपालांच्या किल्ले शिवनेरी भेटीची ही पहिलीच वेळ असल्याने या भेटीला विशेष महत्व आहे. या दौऱ्यासाठी राज्यपाल सकाळी 8 वाजता राजभवन येथून मोटारीने जुन्नरकडे निघणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अवसरी खुर्द येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे थांबणार असून त्यानंतर जुन्नरकडे रवाना होतील.

जुन्नरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रमाधाम येथे येवून ते किल्ले शिवनेरीवर जातील. किल्ले शिवनेरीवर 3 तास भेटीच्या दौऱ्यानंतर ते राजभवनाकडे रवाना होणार आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार