सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोव्हीड 19 रुग्णांची संख्या कमी करणे हे आपल्या सर्वांसमोरील आव्हान -जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना रुग्ण संख्या १२,३००च्या वर गेली असून

Manish Gupta
  • Jul 22 2020 5:40PM
पालघर  :  पालघर जिल्ह्यातील  ग्रामीण भाग आणि वसई विरार महानगरपालिका क्षेत्रामध्ये   कोरोना रुग्ण संख्या १२,३००च्या वर गेली असून   दहा हजारा पेक्षा जास्त रुग्ण संख्या    वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील असुन  दोन हजाराच्या वर  रुग्ण संख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात आढळून आले आहे. वसई विरार  महानगरपालिका क्षेत्रात  आत्तापर्यंत १९२ मृत्यू झाले असून  ३१ मृत्यू पालघर जिल्ह्यातील  ग्रामीण क्षेत्रा मध्ये झाले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी करणे आणि त्यातही मृत्यू दर कमी करणे हे आपल्या सर्वां समोरील आव्हान आहे , यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहेच परंतु जनता, प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रसिद्धी माध्यमे यांनी एकत्र येऊन हे आव्हान पेलले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी केले.
   जिल्ह्यातील covid-19 संदर्भात सद्यस्थितीतील माहिती   देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे दि.२१.७.२०२० रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती ,त्यावेळी ते बोलत होते.

  जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्ण समोर यावेत व त्यांच्यावर त्वरित उपचार करता यावेत यासाठी अँटीजन किट ची संख्या वाढवण्यात आली असून . जेथे रुग्णांची  संख्या जास्त आहे अशा  पालघर,वाडा, जव्हार डहाणू येथे अँटीजन किट वाढवण्यात आले आहेत , त्यामुळे चाचणी कमी वेळात होईल व लवकर अहवाल प्राप्त होईल, अशी महिती यावेळी जिल्हाधिकारी यांनी  दिली. 
   जिल्ह्यातील विलगीकरण कक्षासाठी समन्वय अधिकारी नेमले असून कक्षातील भोजनाचा दर्जा, स्वच्छता,पिण्यासाठी, अंघोळीला गरम पाणी, या सुविधा पुरवण्याचे निर्देश  देण्यात आले असून सी सी टी व्ही बसवण्याचे काम सुरू आहे. 
  सध्या व्हेंटिलेटर, पीपीई किट,N95 मास्क ,ग्लोज चा साठा पुरेसा उपलब्ध असून भविष्यात कमतरता भासनार  नाही  अशी  व्यवस्था करण्यात आली  आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिली .
      मनुष्यबळ कमी असून डॉक्टर, इतर तज्ञांची कमतरता असुन देखील जिल्हा प्रशासनाच्या योग्य नियोजना मुळे कोणतीही समस्या जाणवली नाही. भविष्यात गरज पडलीच तर  खाजगी सेवा आधीगृहीत करण्यात येतील   , संकटाच्या या काळात खासगी डॉक्टरांनी खूप सहकार्य केले असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांचे आभार मानले. या पत्रकार परिषदेच्या वेळी उपजिल्हाधिकारी किरण महाजन , डॉ.सागर पाटील उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार