सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भाजपा नेत्याची हत्या झाल्यानी माहिती समोर येताच शहरात खळबळ माजली

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन खून झाल्याने खळबळ

Sudarshan MH
  • Nov 26 2021 12:48PM

नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसांत तीन खून झाले आहेत. दरम्यान भाजपा नेत्याची हत्या झाल्यानी माहिती समोर येताच शहरात खळबळ माजली आहे. नाशिकमध्ये सातपूर भाजपा मंडल अध्यक्ष अमोल इघे यांची हत्या झाली असून यामुळे शहर हादरलं आहे. यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने अमोल इघे यांना शुक्रवारी सकाळी फोन करून बाहेर बोलावलं. यानंतर त्याने धारधार शस्त्राने अमोल इघे यांच्यावर वार करत हत्या केली. राजकीय पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची शक्यता पोलीस व्यक्त करत आहेत, दरम्यान दिवसाढवळ्या नेत्याची हत्या करण्यात आल्याने शहरात खळबळ माजली आहे.

 अमोल इघे यांच्या हत्येनंतर भाजपा कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर पकडून कडक कारवाई करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

 नाशिकमध्ये गेल्या पाच दिवसातील ही तिसरी हत्या आहे. काही दिवसांपूर्वी म्हसरुळला सराईत गुन्हेगाराची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. तर दोन दिवसांपूर्वी पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेठरोडवरील आरटीओ कार्यालयाजवळ एका भाजी विक्रेत्याची डोक्यावर दगड टाकून हत्या करण्यात आल्याचं उघड झालं होतं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार