शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज विश्लेषण देणारे पंजाब डंख यांना शासकीय महाराष्ट्रभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे - तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन..
शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करणारे पंजाब डंख यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सम्मानित करावे. - कृषिमित्र सचिन बोन्द्रे..
बुलढाणा : गेल्या जवळ जवळ दशकभरापासून शेतकऱ्यांना विनामूल्य हवामान अंदाज सांगून सोशल मीडियाद्वारे/प्रत्यक्ष तथा प्रिंट मीडियाने मार्गदर्शन करणारे, मराठवाड्याचे सुपुत्र शेतीसाठी अभ्यासिक योगदान देणारे पंजाबराव डख यांना शासनाने त्यांच्या कार्यासाठी "महाराष्ट्रभूषण" पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी चिखलीचे माजी नगरसेवक कृषिमित्र-सचिन बोन्द्रे यांनी तहसीलदार चिखली यांना एका निवेदनाद्वारे दिली आहे.
शेतकऱ्यांना/सामान्य नागरिकांना आपल्या सोशल मीडियातील व्हिडिओच्या आणि नागरिकांत प्रत्यक्ष कृतीच्या माध्यमातून वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन करणारे कृषिमित्र सचिन बोन्द्रे हे प्रसिद्ध आहे.
सचिन बोन्द्रे यांनी पंजाबराव डख यांच्या शेतकऱ्याप्रतिच्या जिव्हाळ्याला महत्व देऊन आपल्या फेसबुकला व्हिडिओ शेयर केला. सामान्य जनतेने मोठया प्रमाणात या व्हिडिओला पसंती देऊन सचिन बोन्द्रे यांच्या कार्याला नेहमीप्रमाणे पाठिंबा दर्शविला.
आज सचिन बोन्द्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकरी व वारकरी बांधवांसह शेती आणि मातीसाठी कार्य करणारे पंजाबराव डँख यांना कृषिभूषण पुरस्कारणे सन्मानित करावे ही आपली मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार चिखली यांना केली आहे.
सचिन बोन्द्रे यांच्या या कृतीचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. तसेच निवेदनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा सुद्धा या वेळी दिसला.
या निवेदन तहसीलदार यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खा.शरदचंद्र पवार तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय काँगसचे सचिव तथा माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, अन्न व औषध प्रशासन तथा पालकमंत्री बुलढाणा डॉ. राजेंद्र शिंगणे तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांना सादर करण्यात आले.
तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनावर काँग्रेस नेते कृषिमित्र सचिन बोन्द्रे सह चिखली तालुका काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष समाधान गिते, माजी सभापती डाॅ. सत्येंद्र भुसारी, बाजार समितीचे प्रशासक गजानन परिहार, युवक काँग्रेसचे बाळु साळोक, अॅड. प्रशांत देशमुख, बाळु लहाने, आजाबराव इंगळे, लक्ष्मण भिसे, राजेंद्र लहाने, समाधान आकाळ, परमेश्वर साळवे, संतोष थोरात, अमोल सुरडकर, बाजीराव उन्हाळे, शेख जाकीर, सुभाष खरात, सतिश जगताप, बळीराम हाडे, दत्ता करवंदे, ज्ञानेश्वर इंगळे, गणेश ठेंग, गजानन जाधव, साहेबराव आंभोरे, सतिश जगताप, यांच्या स्वाक्ष-या आहेत.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प