सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला मिळाला.

Sudarshan MH
  • Jul 20 2021 8:39AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर‌ आज प्रतिकात्मक पध्दतीने आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi 2021) सोहळा साजरा होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली आहे. यावेळी वारकरी प्रतिनिधी म्हणून वर्धा येथील विठ्ठल भक्त केशव कोलते आणि इंदुमती कोलते या दाम्पत्याला मिळाला.आषाढी एकादशी ‌असली तरी पंढरीत मात्र शुकशूकाट आहे.

आषाढी एकादशीनिमित्त मंगळवारी पहाटे श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरातील वीणेकरी केशव कोलते आणि त्यांच्या पत्नी इंदूबाई यांना ठाकरे दाम्पत्यासमवेत वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजा करण्याचा मान मिळाला. केशव कोलते विठ्ठल मंदिरात गेल्या वीस वर्षापासून विणेकरी म्हणून सेवा करत आहेत.

 

महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह रश्मी ठाकरे तसेच वारकरी प्रतिनिधींचा मान मिळालेल्या कोलते दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Tourism and Environment Minister Aditya Thackeray) आदी उपस्थित होते.

पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरात आगमन झाले. प्रारंभी श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर श्री रुक्‍मिणी मातेची षोडशोपचार पूजा केली.

 

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसमुळे विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीने दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी विठ्ठल -रखुमाईच्या भक्तांसाठी आजच्या या दिवशी झेंडू आणि ऑरकेट, गुलझडी, गुलाब ,पिंक डीजे, कामिनी फुलांनी पंढरपूरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक आरास केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार