सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात 221 पोलिसांना कोरोनाची लागण

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा देशभरात लॉक डाऊन जारी करण्यात आले. पण अनेक नागरिक लॉक डाऊन चे नियम पाळत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई  करावी लागली. आता पर्यंत जवळपास एक लाख पेक्षा अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले

Aishwarya Dubey
  • May 12 2020 12:00PM

कोरोना संकटात जीव जोखमीत घालून लढणाऱ्या पोलिसांची चिंता दिवसेंदिवस अधिकच वाढत चालली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या चोवीस तासात 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्या 1 हजार 7 वर पोहचली आहे. आतापर्यंत सात पोलिसांनी आपला जीव गमावला असून 113 पोलिस बरे झाले आहेत. 


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा देशभरात लॉक डाऊन जारी करण्यात आले. पण अनेक नागरिक लॉक डाऊन चे नियम पाळत नसल्याने पोलिसांना त्यांच्यावर कारवाई  करावी लागली. आता पर्यंत जवळपास एक लाख पेक्षा अधिक नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

हे गुन्हे दाखल करतानाची प्रक्रिया, जबाब नोंदणी यामुळे पोलिसांचा सर्वसामान्य जनतेशी संपर्क येऊ लागला. या दरम्यान, आता पर्यंत हजार पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यामध्ये 106 आधिकारी आणि 901 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

मागील चोवीस तासात 221 पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आता पर्यंत दिवसाला 60 ते 70 ने वाढणारा आकडा तीन ते साडेतीन पटीने वाढला. एकूण कोरोना बाधित पोलिस रुग्णांमधील सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील आहेत. मुंबईत दोनशे पेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.


तर आत्तापर्यंत मुंबईमधील चार, पुणे, सोलापूर आणि नशिक ग्रामीमध्ये प्रत्येकी एक अशा एकूण सात पोलिसांचा आता पर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जवळपास 3 हजार पेक्षा अधिक पोलिसांना विलगीकरण करण्यात आले आहे. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार