सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

LPG Gas Cylinder: गॅस सिलेंडरचे नवे दर आजपासून लागू

देशभरात वाढणाऱ्या महागाईच्या काळात डिसेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे

Sudarshan MH
  • Dec 1 2020 10:49AM

देशभरात वाढणाऱ्या महागाईच्या काळात डिसेंबर महिन्यात देखील एलपीजी घरगुती गॅस सिलेंडर च्या किंमतींबाबत सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी एलपीजी घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतेही बदल केले नाही आहेत. 1 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होत आहेत. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतेही बदल झाले नव्हते. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरमध्ये 55 रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे.

LPGच्या किंमतीत जुलैमध्ये झाली होती शेवटची वाढ

याआधी जुलै 2020 महिन्यात 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरची किंमत साधारण 4 रुपयांपर्यंत वाढली होती. जून महिन्यात दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या एलपीजी सिलेंडरची किंमत 11.50 रुपयांनी वाढली होती. मे मध्ये एलपीजी 162.50 रुपयांपर्यंत स्वस्त झाला होता.

 

देशातील सर्वात मोठी तेल मार्केटिंग कंपनी IOC च्या वेबसाइटच्या मते मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती स्थीर आहेत. मुंबईमध्ये 14.2 किलोग्रॅम सबसिडी नसणाऱ्या घरगुती गॅसची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. जून आणि जुलै महिन्यात घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या होत्या. परंतू ऑगस्टपासून किंमती स्थीर ठेवण्यात आल्या आहेत

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार