सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लॉकडाऊनचे, संचारबंदीचे व जमावबंदीच्या नियमांना फाट्यावर मारत बोईसरमध्ये दारू पिण्याच्या वादातून नातेसंबंधीताची हत्या.

बोईसर, लॉकडाऊनचे, संचारबंदीचे व जमावबंदीच्या नियमांना फाट्यावर मारत बोईसरमध्ये दारू पिण्याच्या वादातून नातेसंबंधीताची हत्या... दारू पिण्याच्या वादातून एकाची हत्या

Sudarshan MH
  • May 11 2020 12:23PM

बोईसर :  बोईसर पालघर रोड वरिल यशवंत सृष्टि समोर काल दि. 6 रोजी दारू पिण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीत रामविलास राजभर पुण व जगदेश राजभर पुण यांच्यात दुपारी दारू पिण्यावरून वाद झाला होता. याचा मनात राग धरून रामविलास राजभर पुण याने सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जगदेश याला लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण केल्याने त्यास गंभीर दुखापत झाली होती. दरम्यान जगदेश यास बोईसर ग्रामिण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता राञी 10.30 वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 
यशवंत सृष्टि समोर राजेश टायरवाला याचे टायर सर्व्हिसचे दुकान असून त्यालगतच चहाची टपरी आहे. याच ठिकाणी एमआयडीसीच्या जागेत ट्रक टर्मिनल असून अनेक ट्रक पार्किंग केलेले असतात व ट्रक ड्राइवर व त्यांचे इतर सहकारी याच ठिकाणी जेवण बनवने राहणे नशा इत्यादी चालू असते काल दुपारी बाराच्या सुमारास या दोघांसह अन्य इतर तीन ते चार जणांनी वाईन शॉप मधून  आणलेली दारू पिण्यावरून वाद झाला होता. 
याचाच राग मनात धरून रामविलासने सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास जगदेश हा याठिकाणी बंद असलेल्या चहा टपरीवर बसला असता त्याच्यावर हल्ला केला यात गंभीर जखमी झालेल्या जगदेशचा राञी उपचारा दरम्यान मृत्यु झाला. 
बोईसर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हाच्या गुन्ह्यांची नोंद झाली असून, पुढिल तपास सुरू आहे.  दरम्यान अध्याप कोणास ही अटक करण्यात आलेली 
नाही.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार