सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मकर संक्रांतीच्या दिवशी का करतात तीळ आणि गुळाचे सेवन? जाणून घ्या

यावेळी १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी आवर्जून तीळगुळाचे सेवन केले जाते.

Sudarshan MH
  • Jan 11 2022 12:34PM

Makar Sankranti 2022: जेव्हा सूर्य देव धनु राशीतून निघून मकर राशीत जातो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. यावेळी १४ जानेवारी २०२२ रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर ही शनिदेवाची रास आहे. हिंदू धर्मात शनिदेवाला सूर्यदेवाचा पुत्र म्हटले जाते. अशा स्थितीत मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला मुलगा शनिदेवाच्या घरी जातो असे मानले जाते. शनीच्या घरी जाताना सूर्य इतका तेजस्वी होतो की त्याच्यासमोर शनीचे तेजही मावळते.

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा काळ्या तीळाने केली जाते. यासोबतच काळी मसूर, तांदूळ, तूप, मीठ, गूळ आणि काळे तीळ दान केले जातात. काळे तीळ आणि गुळाचे लाडू खातात आणि दानही करतात. असे मानले जाते की यामुळे सूर्यदेव आणि शनिदेव या दोघांची कृपा प्राप्त होते. जाणून घ्या काळे तीळ आणि गुळाचे महत्त्व

हे आहे धार्मिक महत्त्व

ज्योतिषशास्त्रात काळ्या तिळाचा संबंध शनिदेवाशी आणि गुळाचा संबंध सूर्यदेवाशी मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव मकर राशीत शनिदेवाच्या घरी जातो, अशा स्थितीत काळे तीळ आणि गुळाचे लाडू सूर्य आणि शनी यांच्यातील मधुर नाते दर्शवतात. ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनि हे दोन्ही ग्रह बलवान मानले जातात.अशा वेळी काळे तीळ आणि गुळाचे लाडू दान करून आणि प्रसाद स्वरूपात खाल्ल्यास शनिदेव आणि सूर्यदेव दोघेही प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने घरात सुख-समृद्धी येते.

हे आहे वैज्ञानिक महत्त्व

वैज्ञानिक दृष्ट्याही मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळाचे लाडू खाणे आणि दान करणे याला विशेष महत्त्व आहे. वास्तविक मकर संक्रांत हा उत्तर भारतातील मोठा सण मानला जातो. हा दानाचा सण मानला जातो. ज्या वेळी हा सण येतो, त्या वेळी उत्तर भारतात थंडी असते. गूळ आणि तीळ या दोन्हींचा प्रभाव खूप गरम असतो. लोकांना थंडीच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी गूळ आणि तीळाचे लाडू दान केले जातात. तसेच लोक स्वत: ते सेवन करतात. यामुळे त्यांच्या शरीराला ऊब मिळते आणि त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार