सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Mother's day ला घरच्या घरी तुम्ही असं सरप्राइझ देऊ शकता

Mother's day ला घरच्या घरी तुम्ही असं सरप्राइझ देऊ शकता जे तुमच्यासाठी साधं असेल मात्र आईसाठी मौल्यवान.

Aishwarya Dubey
  • May 10 2020 9:38AM

मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजे मदर्स डे. जी आई आयुष्यभर आपल्यासाठी झिजते तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. तसं आईबद्दल प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची गरज नाही. मात्र धावपळीच्या जीवनात तसा वेळ मिळत नाही किमान एक दिवस तरी तिला देऊया. सध्या कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. त्यामुळे आईला तुम्ही महागडं गिफ्ट तर नाही देऊ शकत मात्र घरच्या घरी तुम्ही असं सरप्राइझ देऊ शकता ज्यामुळे तुमच्या आईच्या चेहऱ्यावर नक्की हसू फुलेल.

कोलाज गिफ्ट करा - आईला आपल्या मुलांसोबत घालवलेलं क्षण कधीही प्रियच असातत. असेच काही क्षण जर तुमच्याकडे फोटोमध्ये टिपलेले असतील तर अशा फोटोंचा कोलाज करा आणि आईला गिफ्ट करा. हे फोटो पाहून तुमच्या आईच्या डोळ्यातून आनंदाश्रूच येतील. तुम्हाला हे गिफ्ट साधं वाटत असेल तरी तिच्यासाठी हे सर्वात मौल्यवान असं गिफ्ट असेल.

तिचा आवडता पदार्थ बनवा - आई नेहमी तुमच्या आणि घरातील इतर सदस्यांच्या आवडीनिवडीचा विचार करते. खाण्यापिण्याच्या बाबतीही हेच असतं. त्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या हातानं तिच्या आवडीचा पदार्थ बनवा आणि तिला प्रेमानं खाऊ घाला.

मसाज द्या - तुम्ही घराबाहेर काही कामानिमित्त गेल्यानंतर काही तासांत इतकं दमून येता. मात्र आई घरात कित्येक तास राबत असते. त्यात ती वर्किंग वुमन असेल तर घर आणि बाहेरची कामं असं दोन्ही सांभाळत असते. तिचं शरीर खरंतर थकलेलं असतं. मात्र तिच्या चेहऱ्यावर ती थकवा कधीच जाणवू देत नाही. किमान आजच्या दिवस तरी तिला थोडा मसाज द्या. हेड मसाज, हातापायांना मसाज दिल्यानं तिला आराम मिळेल.

ब्युटी ट्रिटमेंट - प्रत्येक आई पार्लरमध्ये जातेच असं नाही. याचा अर्थ तिला आवडत नाही असं नाही. मात्र तिनं कुटुंबामध्ये स्वत:ला इतकं गुंतवलेलं असतं की स्वत:ला विसरते. सध्या लॉकडाऊन आहे, त्यामुळे ब्युटी पार्लरही बंद आहेत. तुम्हीही घरात आहात तर मग तुम्हीच आईचे ब्युटीशियन का होत नाहीत. घरच्या घरी छानसा एक होममेड फेस मास्क तयार करा आणि आईच्या चेहऱ्यावर लावा. ती केस डाय करत असेल तर ते तुम्ही करून द्या किंवा केसांना मेहंदी लावायला आवडत असेल तर मेहंदी लावून द्या.

एक दिवस सुट्टी द्या - तुम्ही कॉलेज, ऑफिसमध्ये जाता तेव्हा हक्काची सुट्टी घेता. आता लॉकडाऊनमुळे काही जण वर्क फ्रॉम होम करत असले, तरी ज्यांचं वर्क फ्रॉम होम शक्य नाही ते सध्या सुट्टीवरच आहेत. मात्र आईला काही सुट्टी नाही. त्यामुळे किमान आता घरात असताना तरी तुम्ही तिला सुट्टी द्या. एक दिवस तरी तिची दिवसभराची सर्व कामं तुम्ही करा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार