सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुलवामानंतर आता होतं कुलगाम लक्ष्य : 2 दहशतवादी ठार

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे

Aishwarya Dubey
  • May 30 2020 12:02PM

 पुलवामानंतर आता पुन्हा जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यादरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार चालू झाला. वानपोरा परिसरात दहशतवाद्यांनी जवानांवर भ्याडपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. या कारवाईत दोन जण जागीच ठार झाले आहेत. सुरक्षा दलाकडून कुलगाम सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पुलवामा इथे लॉकडाऊनदरम्यान हिजबुलकडून 28 मे रोजी मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या 30 गाड्या आणि 400 जवानांना लक्ष्य करण्यासाठी 10 किलो वजाने IED स्फोटकं भरलेली सॅन्ट्रो कार पुलवामामध्ये पाठवण्यात आली होती. या दहशतवादी कटाची माहिती पोलिसांनी आधीच मिळाल्यानं सुरक्षा दल आणि पोलीस सतर्क होते आणि त्यामुळे थोडक्या पुन्हा पुलवामा होण्याचं टळलं.

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिक हा त्या कारचा मालक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारमध्ये स्फोटकं भरून ती कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर धडकवायची असा त्या दहशतवाद्यांचा डाव होता. तो डाव फसला होता आणि मोठा घातपात टळला होता. आता NIA त्या कटाची पाळमुळए शोधून काढत आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार