सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जम्मू-काश्मीरमध्ये नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचे अभियान सुरू आहे. आज पहाटे पाच वाजता नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली.

Aishwarya Dubey
  • Nov 19 2020 11:44AM

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात जवानांचे अभियान सुरू आहे. आज पहाटे पाच वाजता नगरोटा येथील बान टोल नाक्याजवळ ट्रकमधून आलेल्या दहशतवाद्यांमध्ये व जवानांमध्ये जोरदार चकमक झाली. ज्यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. या चकमकीनंतर संपूर्ण परिसरात कडकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय, जवानांकडून सर्व वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.

 

दरम्यान गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी नगरोटा भागात जागोजागी बंदोबस्त ठेवला होता. वाहनांची तपासणी केली जात असतानाच, ट्रकमधून आलेले दहशतवादी जंगलाकडे पळू लागले. यावेळी जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली.

 

या चकमकीत चार दहशतवादी ठार केले गेले. नंतर जम्मू-श्रीनगर महामार्ग देखील बंद करण्यात आला. प्राप्त माहितीनुसार हे दहशतवादी ट्रकद्वारे जम्मू-श्रीनगर मार्गाने काश्मीरला जात होते. याच दरम्यान टोल नाक्यावर सुरू असलेली वाहनांची तपासणी पाहून ते जंगलात पळ काढत असतानाच, चकमक सुरू झाली.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार