सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून टॉप कमांडरसह 3 दहशतवादी ठार

बुधवारी संध्याकाळपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होतं. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्होरक्या असल्याची माहिती मिळाली आहे.

Aishwarya Dubey
  • Oct 7 2020 9:51AM

 जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी पहाटेपासून पुन्हा एकदा दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. शोपियांमधील सुजान सेक्टरमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू होतं. त्याचं वेळी अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलाकडून या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. मंगळवारपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या झालेल्या या चकमकीत टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आलं आहे.

या परिसरात सुरक्षा दलाकडून सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सुरू झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. बुधवारी संध्याकाळपासून परिसरात सर्च ऑपरेशन सुरू होतं. ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांपैकी एक म्होरक्या असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोपियां जिल्ह्यातील झानपोरा भागातील सुजान या गावात अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली. घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर परिसरात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरूच आहेत. सोमवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 2 जवान शहीद तर 3 जवान जखमी झाले होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार