राजधानी दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं शुक्रवारी मध्यरात्री घातपाती कट उधळून लावला. रिंग रोड परिसरातील धोला कुवा येथून पोलिसांनी ISI च्या अतिरेक्याला अटक केली. अटक करण्यापूर्वी पोलीस आणि अतिरेक्यामध्ये चकमक उडाली. मात्र, नंतर पोलिसांनी धडक कारवाई करत अतिरेक्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याजवळून आयईडी स्फोटकांसह मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्री इस्लामिक दहशतावादी संघटना आयएसआयचा कट उधळून लावला. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं मोठी कारवाई करत एका अतिरेक्याला अटक केली. अतिरेक्याला अटक करण्यापूर्वी मोठी चकमक झाली. मात्र, काही वेळातच पोलिसांनी अतिरेक्याला ताब्यात घेतलं. अबू युसूफ असं या अतिरक्याचं नाव असून, आयएसआय या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.