सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

Indian Army Day:....असा आहे अभिमानास्पद इतिहास

आज राष्ट्रीय लष्कर दिवस आहे. 15 जानेवारी 2021 आज आपण 74वा राष्ट्रीय लष्कर दिन साजरा करत आहोत.

Sudarshan MH
  • Jan 15 2021 1:00PM

हिमालयातील गोठवणाऱ्या थंडीत, राजस्थानच्या उन्हातील वाळवंटात, गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यांचं 24 तास डोळ्यांत तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांचा सन्मान करण्याचा आज दिवस आहे. आज राष्ट्रीय लष्कर दिवस आहे. 15 जानेवारी 2021 आज आपण 74वा राष्ट्रीय लष्कर दिन साजरा करत आहोत. याच दिवशी लष्करी कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या तसंच अतुलनीय शौर्य दाखवलेल्या जवानांना गॅलेंटरी आणि सेना पदक देऊन गौरवण्यात येतं.

लष्करदिनानिमित्त देशभर संचलनं आणि विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दिल्ली कँटोन्मेंटमध्ये असलेल्या करिअप्पा परेड ग्राउंडवर लष्करदिनाचं मुख्य संचलन होतं. या वेळी लष्करातील विविध शस्रास्र, रनगाडे, टेहळणी यंत्रणा यांचं सादरीकरण केलं जातं. गेल्यावर्षी कॅप्टन तानिया शेरगिलने लष्करदिनाच्या संचलनाचं नेतृत्व केलं होतं. ही जबाबदारी सांभाळणारी ती पहिली महिला ऑफिसर ठरली होती.

राष्ट्रीय लष्कर दिनाचा इतिहास

भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला, पण 1949 मध्ये ब्रिटिश लष्कराने लष्कराची सर्व सूत्रं भारतीय अधिकाऱ्यांकडे सोपवली. शेवटचे ब्रिटिश कमांडर-इन-चीफ जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून लेफ्टनंट जनरल के. एम. करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 ला भारतील लष्कराची सूत्रं स्वीकारली. ले.जनरल करिअप्पा हे स्वतंत्र भारताच्या लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ होते.

कोडनदेरा ‘किप्पर’मदप्पा करिअप्पा यांना के. एम. करिअप्पा या नावाने ओळखतात. 1947 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात पश्चिमेच्या आघाडीवर करिअप्पा यांनी भारतील लष्कराचं नेतृत्व केलं होतं. भारतात दोघांना फील्ड मार्शल ऑफ इंडिया ही मानाची पदवी मिळाली आहे त्यापैकी एक करिअप्पा आहेत. तर, सॅम माणकेशॉ हे दुसरे फील्ड मार्शल ऑफ इंडिया पदवी मिळवणारे ठरले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार