सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा झाली आहे - चंद्रकांत पाटील

आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात,

Sudarshan MH
  • Feb 7 2021 10:42AM

“आपण सचिन तेंडुलकरच्या मताशी असहमत किंवा सहमत होऊ शकता, पण आपल्या खेळाने जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणाऱ्या अशा खेळाडूचा अपमान तेच करू शकतात, ज्यांची विचारधारा व देशाप्रतीच्या निष्ठेत खोट असेल. हा केवळ भारतरत्न सचिन तेंडुलकरचा अपमान नाही, तर भारताचा व प्रत्येक भारतीयांचा अपमान आहे. अशा शब्दांमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.”

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन पॉपस्टार रिहानाने केलेल्या ट्विटनंतर नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात सचिन तेंडुलकरने ट्विट करत अप्रत्यक्षपणे रिहानावर टीका केल्याचे समोर आल्याने, सचिनबद्दल विविध प्रतिक्रिया समोर आहेत. केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून त्याचा निषेध नोंदवला. यामुळे आता भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून काँग्रेसवर जोरदार टीका केली जात आहे.

“एकदा केरळ येथील युवक कॉंग्रेसने बीफ बॅनविरुद्ध आंदोलन करत असताना गौमातेला भर रस्त्यात कापून टाकल्याचे दृश्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा गौरव असणाऱ्या सचिन तेंडुलकर यांचा केरळ युवक काँग्रेसने केलेल्या अपमानाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो!” अशा शब्दांमध्ये चंद्रकांत पाटील यांनी युवक काँग्रेसच्या कृतीचा निषेध नोंदवला आहे.

 

तसेच, “राहुल गांधी केरळमधील वायनाडचे खासदार आहेत, हे सर्व जर राहुल गांधींच्या समंतीने घडले असेल तर यापेक्षा लज्जास्पद देशासाठी अधिक काही असू शकत नाही. देश आणि देशाच्या प्रतीकांचा अपमान करणे ही कॉंग्रेसची परंपरा झाली आहे.” असा घणाघात देखील चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधींसह काँग्रेसवर केला आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार