सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील नागरिकांना महत्वपूर्ण आवाहन केलं

पोलिओ लसीकरणाच्या वेळी देखील वेगवेगळ्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, असे देखील सांगितले.

Sudarshan MH
  • Jan 2 2021 11:57AM

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असून, या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून आज (२ जानेवारी) करोना वॅक्सीनसाठी देशातील प्रत्येक राज्यात ‘ड्राय रन’ (सराव फेरी) घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी देशातील नागरिकांना महत्वपूर्ण आवाहन केलं आहे.

जीटीबी रुग्णालयाचा दौरा केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मी आवाहन करतो आहे की कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नये. सुरक्षा आणि लसीची कार्यक्षमता सुनिश्चित करणे हे आमचे प्राधान्य आहे. पोलिओ लसीकरणाच्या वेळी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या, परंतु लोकांनी ही लस घेतली आणि भारत आता पोलिओमुक्त झाला आहे.”

 

तसेच, चार राज्यांमधील ड्राय रन नंतर मिळालेल्या अभिप्रायांचा समावेश लसीकरणाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आला असल्याचेही डॉ.हर्षवर्धन यांनी यावेळी सांगितले. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आज सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशात ड्राय रन घेतला जात आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने सांगितल्यानुसार, सर्व राज्य, केंद्रशासित प्रदेशांच्या एकूण ११६ जिल्ह्यांमध्ये २५९ जागांवर आज COVID-19 वॅक्सीनसाठी ‘ड्राय रन’ घेण्यात येणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार