सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील--गृहमंत्री

केंद्र सरकारने ई-पासबाबत नव्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहिल, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं.

Snehal Joshi .
  • Aug 24 2020 10:55PM
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ई-पासबाबत मोठी घोषणा केली. सध्या महाराष्ट्रात ई-पासमध्ये सवलत नसेल. केंद्र सरकारने ई-पासबाबत नव्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग पाहता ई-पासची सक्ती कायम राहिल, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी काही दिवसांनंतर ई-पास धोरणावर पुनर्विचार केला जाईल, असंही नमूद केलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अनिल देशमुख म्हणाले, “केंद्र सरकारने वाहतुकीबाबत काही नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बोललो आहे. आपण काही काळ निर्बंध कमी केले. मात्र, त्यानंतर ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढला. सुरुवातीला 3 महिने ग्रामीण भागात कोरोना नव्हता. मात्र, निर्बंध कमी केल्यानंतर संसर्गाचं प्रमाण वाढलं. त्यामुळे सध्यातरी महाराष्ट्रात ई-पासबाबत आहे तेच नियम राहतील. काही दिवसांनी यावर पुनर्विचार केला जाईल.” 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार