सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती

मृत्युंजय स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती

स्नेहल जोशी
  • May 28 2020 2:30PM

स्वातंत्र्यवीर सावरकर देशभक्ती साठी  जन्माला आले असले तरी क्रांतिकारी, तत्वज्ञानी, विचारवंत, कर्ते  समाजसुधारक, कवी,  हिंदुत्व निष्ठा, विज्ञानवादी हे  त्यांचे व्यक्तिमत्त्वात विशेष. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनात ज्या गोष्टी सामान्य  लोकांना प्रेरक ठरल्या त्या म्हणजे त्यांच्या कविता...ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला

  मराठी मनावर अविरत राज्य करणारी ही कविता, स्वातंत्र्यवीरांची ओळख

 चाफेकयांना झालेल्या फाशीच्या शिक्षेने पेटून उठून वयाच्या पंधराव्या वर्षी सावरकरांनी शपथ घेतली. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी  सशस्त्र युद्धात शत्रूस  मारीत  चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन मातृभूमीच्या मस्तकी  स्वराज्याचा   राज्याभिषेक करवीन. मातृभूमीसाठी, तुजसाठी मरण ते जनन ही ध्येयनिश्चिती ठरली. 

 स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने धारण केलेले काव्य रूप होय. स्वातंत्र्यवीर सावरकर जसे जीवन जगले तसे त्यांच्या साहित्यात उतरले.  कवीची प्रतिभा त्यांना लाभली असूनही पांडित्याचा, विद्वत्तेचा ध्यास त्यांनी कधी धरला नाही. आपल्या जीवना प्रमाणे आपले काव्यही  देशस्वाहा केले.  आपल्या कवितेला स्वातंत्र्यप्राप्तीचे देश उद्धाराचे साधन मानले.  नकळत त्यांची बहुआयामी प्रतिभा अगदी सहजपणे त्यांच्या काव्यातून प्रगट झाली.  आणि स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होताना ते  आपल्यातल्या कविता बाजूला ठेवू शकले नाही.

1906 मध्ये सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला गेले. तेथे असतांनाही  त्यांचे देशकार्य सुरू होते. त्यासाठी त्यांना तिथे अटक करण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्यांना भारतात आणण्यासाठी 1 जुलै 1910 रोजी मोरिया बोटीवर चढवण्यात आले. 8 जुलै रोजी ही बोट बंदरात थांबली असताना पळून जाण्यासाठी सावरकरांनी जगप्रसिद्ध उडी समुद्रात मारली. पण त्यात अपयशी ठरले. त्यांना पकडून पुन्हा बोटीवर आणण्यात आले ब्रिटिशांनी  त्यांचा छळ सुरू केला त्यांच्या हातकड्या अहोरात्र निघेनाशा झाल्या. शिव्याशाप व  अभद्र भाषेचा वापर सावरकरांवर होऊ लागला. द्रष्टेपणा मुळे पुढे घडणार्‍या सगळ्या घटना सावरकरांच्या मनात चक्षु समोर स्पष्ट दिसू लागल्या काळ्यापाण्याची कठोर शिक्षा... कदाचित फाशी... भयंकर यातना, वेदना शारीरिक आणि मानसिकही! क्रांतिकारक म्हणून होणारा छळ, पळून जाण्याचा प्रयत्न केला. म्हणून अजून अमानुष छळ अशा परिस्थितीत आपले ध्येय साध्य करायचे असेल तर या सर्वांना पुरून उरले पाहिजे, अशावेळी त्यांना आठवली ती   भगवतगीता.   गीतेतल्या सांख्ययोग या अध्यायातील नैनं छिन्दन्ति शस्त्राणि.... आत्मबलाची ची अनुभूती करून दिली.
 या सांख्य दर्शनातून त्यांचे आत्मबल कविता जन्मास आली... प्रचंड आत्मविश्वास असलेले त्यांचे व्यक्तिमत्व या कवितेतून अगदी सरस जाणवते.  पहिल्या कडव्यात ते म्हणतात स्वतःची सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून धर्मधारणेसाठी (देशभक्तीचा  धर्म ) मृत्यूचा हात धरून मी या स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. माझे ध्येय पूर्ण झाल्याशिवाय अग्नि मला जाळू शकत नाही, शस्त्र मलाच छेदु शकत नाही. मला पाहून मृत्यूच घाबरत पळत सुटतो. अनादि, अनंत असणारा मला खुळा शत्रु मूर्खासारखी सतत मृत्यूची भीती दाखवतो.

 आत्मबळाचा चा हा मंत्र त्यांना आयुष्यभर निर्भयता देत राहिला. या आत्मबलाचा संदर्भ  त्यांच्या आयुष्यातील पुढील घटनेशी सहज जोडू  शकतो. अंदमानात   काळ्यापाण्याची शिक्षा भोगताना त्या विपरीत परिस्थितीतही देशकार्य सुरू होते. अंदमानचा तुरुंग त्यांच्या कार्याला बंदिस्त करू शकला नाही. शत्रूने शिक्षारुपी  होलिकाच पेटवली होती. 
कोलू फिरवणे, काथ्या  फुटणे, आठआठ  दिवस   बेड्यामध्ये लटकवून ठेवणे या प्राणघातक शिक्षा. कुठलेही लेखन साहित्य शिवाय त्यांच्या प्रतिभेने तयार केलेली  महाकाव्य निर्मिती
 म्हणजे कठोर शिक्षा सुसह्य करणारी शितल  भगवंत कृपाच !

 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर  यांनी असे देखील म्हटले की दयाळु मृत्यु आपली अंदमानातून सुटका करील. असा विचार करीत असताना अंदमानात पाऊल  ठेवणार्या सावरकरांची 1921 मध्ये सुटका झाली. तेथेही त्यांचे आत्मबल वरचढ ठरले.

 याची देही याची डोळा त्यांनी भारत स्वतंत्र झालेला पाहिला. त्यांचे ध्येय सार्थक झाले.
 मात्र स्वतंत्र भारतात देखील त्यांच्या ललाटी तुरुंगवास लिहिला होता.  गांधींचा खून प्रकरणात त्यांना परत एक वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. काळ्यापाण्याच्या शिक्षेपेक्षाही अधिक  आत्म बलाची  कदाचित गरज या काळात त्यांना असेल. मृत्यूला वारंवार हुसकावून लावताना पराभूत मृत्यू परत   त्यांच्यासमोर येणार नाही याची जाणीव त्यांना होती. म्हणूनच प्रयोपवेशन करून खऱ्या अर्थाने अनादि-अनंत व अवैध ठरलेले  मृत्युंजय सावरकर 26 फेब्रुवारी 1966 रोजी ते मृत्यूला सामोरे गेले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार