सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस; तर मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस

थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत

Abhimanyu
  • Dec 14 2020 11:38AM

मुंबई : ऐन हिवाळ्यात मुंबई सह मराठावाडा आणि कोकणत पावसानं हजेरी लावली आहे. थंडीच्या मोसमात स्वेटर घालण्याऐवजी आता मुंबईकरांना चक्क छत्री आणि रेनकोट घेऊन घराबाहेर पडावं लागत आहे. राज्यातील काही ठिकाणी मध्यरात्रीपासून तर काही ठिकाणी पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. तसेच मराठवाडा, कोकणातील अनेक भागांत पावसाच्या तुरळक सरी कोसळत आहेत.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं  मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि कोकणातील काही भागांध्ये शनिवारी आणि रविवारी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. तर मुंबई, ठाणे आणि कोकणसह मराठवाडा, विदर्भात गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे ढगाळ वातावरण पुढच्या एक-दोन दिवसांत निवळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.

मराठवाड्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस



मराठवाड्यातील बीड, परभणी सह इतर भागत पहाटेपासुन मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत असून मागच्या आठवड्यापर्यंत परभणी जिल्ह्यात तापमान हे 8 अंशपर्यंत घसरून कडाक्याची थंडी पडली होती. मात्र आज पहाटेपासूनच जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतोय.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार