नवी दिल्ली : संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस बलात्कार प्रकरणातील
चार आरोपींना दोषी ठरवत सीबीआयने त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केली आहे.
उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये एका दलित तरुणीवर अत्याचार केल्यानंतर आरोपींनी क्रूरतेची परिसीमा पार केली होती. तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणावरुन संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. याप्रकरणाचा तपास काही दिवसांपूर्वी सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. आता याप्रकरणी सीबीआयने चार आरोपींना दोषी ठरवत त्यांच्या विरोधात चार्जशीट दाखल केलीय. या चार्जशीटमध्ये तरुणीसोबत सामूहिक बलात्कार करुन त्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं आहे. शुक्रवारी सीबीआयच्या वतीनं दोन हजार पानांहून अधिक पानांची चार्जशीट दाखल केली आहे. आता संपूर्ण देशभरात चर्चिल्या गेलेल्या हाथरस प्रकरणी 4 जानेवारी 2021 रोजी सुनावणी पार पडणार आहे.