सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नवरात्रौत्सवात सोन्याचे नवे दर ! इथे वाचा..

आजपासून नवरात्रौत्सव सुरू होत आहे. सणासुदीच्या काळात सोनेखरेदी करण्याची परंपरा अनेकजण जपतात. तुम्ही देखील अशीच योजना आखत असाल, तर त्याआधी जाणून घ्या सोन्याने लेटेस्ट दर

Aishwarya Dubey
  • Oct 17 2020 11:21AM

या आठवड्यामध्ये सोन्याचे दर घसरल्याचे पाहायला मिळाले असले तरीही,  शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी पाहायला मिळाली. त्याआधी सलग 3 दिवस सोन्याचे दर उतरले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीचा सपोर्ट देशांतर्गत बाजारीतल किंमतीना मिळाल्याने सोन्याचे दर वाढले आहे. कोरोनामुळे सर्वत्र अनिश्चितता आहे, काही देशांनी लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत.

सोन्याचे नवे दर

सलग तीन दिवस सोन्याचे दर उतरल्यानंतर शुक्रवारी दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा 324 रुपयांने वाढले आहेत. यानंतर सोन्याचे दर 51,704 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. गुरुवारी सोन्याचे दर 51,380 रुपये प्रति तोळा होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या मौल्यवान धातूची किंमत 1,910 डॉलर प्रति औंस आहे.

चांदीचे नवे दर

शुक्रवारी सोन्यापाठोपाठ चांदीमध्ये देखील तेजी पाहायला मिळाली. दिल्लीतील सराफा बाजारत चांदीची किंमत 1595 रुपये प्रति किलोने वाढून 62,972 रुपये झाली आहे. गुरुवारी चांदीचे भाव 61,374 रुपये प्रति किलो होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 24.35 अमेरिकी डॉलर प्रति औंस आहेत.

सोन्याचे भाव वाढण्याचे कारण

एचडीएफसी सिक्योरिटीजचे सीनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सोन्याच्या किंमती का वाढल्या याबाबत दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संक्रमण वाढत असल्यामुळे सर्वच देशात अनिश्चितता आहे.  अनेक युरोपिय देशांनी पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढवला आहे. परिणामी सोन्या-चांदीचे दर वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय  बाजारात देखील सोन्याचांदीच्या दरात तेजी आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार