सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

लालबाग-परळ भागांत शिवसेना रुजवण्यात मोहन रावले यांचा मोलाचा वाटा होता.

Abhimanyu
  • Dec 19 2020 11:26AM

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय माजी खासदार मोहन रावले यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी रावले यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहन रावले हे शिवसेनेचे 5 वेळा खासदार राहिले असुन सर्वसामान्यांचे नेते आणि लालबाग-परळ ब्रँड अशी मोहन रावले यांची राज्यात ओळख होती.



मोहन रावले यांना गोव्यात असताना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. मोहन रावले यांच्यावर आज रात्री किंवा उद्या सकाळी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. आज रात्री मोहन रावले यांचं शव गोव्याहून मुंबईत आणलं जाणार आहे.



लालबाग-परळमधील लोकप्रिय नेते असणाऱ्या मोहन रावले यांची लालबाग-परळ ब्रँड अशी ओळख होती. लालबाग परळमध्ये वाढलेले मोहन रावले हे सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जायचे. शिवसेनेकडून ते 5 वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. क्रिकेटची आवड असणारे मोहन रावले क्रिकेटमध्ये करिअर करु असणाऱ्यांनाही प्रोत्साहन द्यायचे. 



लालबाग-परळमध्ये शिनसेनेच पक्षवाढीचं कामही त्यांनी केलं असून लालबाग-परळ या भागांत शिवसेना रुजवण्यात मोहन रावले यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी पक्षासाठी मोलाचं योगदान देताना अनेक शिवसैनिकही घडवले. शिवसेनाचा खंदा कार्यकर्ता गेल्यामुळे शिवसेनेत शोककळा पसरली आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार