सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

‘आपलं क्षेत्र सोडून बाकी विषयावर बोलताना काळजी घ्यावी’- शरद पवारांचा सचिनला सल्ला

शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात.

Sudarshan MH
  • Feb 7 2021 10:35AM

आंतरराष्ट्रीय पॉप गायिका रिहानाने सर्व प्रथम शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारे टि्वट केल्यानंतर देशातील वातावरण ढवळून निघाले. रिहाना, ग्रेटा थनबर्ग आणि मिया खलिफा या आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे टि्वट केल्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी त्या विरोधात भूमिका घेतली. त्यांनी देशवासियांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.

भारताचा सर्वोत्तम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर ते लता मंगेशकर यांनी सरकारला अनुकूल ठरणारी भूमिका घेतली. त्या विषयावर, आज पुण्यात कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी शरद पवारांनी सचिन तेंडुलकरला एक सल्ला दिला.

“लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील.” असे शरद पवार म्हणाले.

“इतके दिवस कष्टकरी वर्ग रस्त्यावर बसला आहे. त्याचा विचार करायला पाहिजे. त्याचाच प्रतिसाद आंतरराष्ट्रीय स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत. सहानुभूती मिळते. हे खरं तर चांगलं नाही. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते. आता त्यांची प्रतिक्रिया येत आहे. शेतकऱ्यांना कधी खलिस्तानी म्हणतात कधी अतिरेकी म्हणतात. शेतकरी आंदोलनाला बदनाम करत आहेत” असे शरद पवार म्हणाले.

“शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे. वरिष्ठ मंत्र्यांनी पंतप्रधान, संरक्षणमंत्री, गडकरी सारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला, तर मार्ग निघण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांचा अनादर करण्याचा हेतू नाही” असे शरद पवारांनी सांगितले. “सर्वोच्च स्तरावर जर प्रयत्न केला, तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण स्पष्ट होत आहे. अन्नदाता जर रस्त्यावर बसतो. तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे” असे शरद पवार म्हणाले.

काय टि्वट केलं होतं सचिन तेंडुलकरने
“भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड अजिबात मान्य नाही. बाह्यशक्ती फक्त पाहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारतीयांना भारत माहित आहे आणि तेच भारताबद्दल ठरवतील. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया” असे टि्वट सचिन तेंडुलकरने केले होते. सचिन तेंडुलकरने हे टि्वट करताना #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅगही दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार