सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबईत NCBचे अटकसत्र सुरू

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या अंंमली पदार्थ तस्करी अँगलमध्ये NCB चे मुंबईमध्ये अटकसत्र सुरू झाले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Aishwarya Dubey
  • Sep 2 2020 11:22AM

अभिनेत्री सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी (Sushant Singh Rajput Death Case) अंमली पदार्थ तस्करीचा अँगल समोर आल्याने हे प्रकरण एका धक्कादायक वळणावर गेले आहे. दरम्यान अंंमली पदार्थ तस्करी (Drug Dealing) प्रकरणी NCB चे मुंबईमध्ये अटकसत्र सुरू झाले आहे. यामध्ये रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) अडचणी वाढण्याची शक्यत आहे. कारण या अटक झालेल्या दोघांशीही तर शौविकचे (Showik Chakraborty) आणखी कनेक्शन उघडकीस आले आहे. जैद आणि बशीद अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत.

NCB कडून आतापर्यंत फक्त चौकशी सुरू होती मात्र आता याप्रकरणात जैद या ड्रग डीलरची पहिली अटक करण्यात आली.  मंगळवारी एनसीबीकडून जैद नावाच्या ड्रग डीलरला अटक करण्यात आली आहे.  जैद हा मुंबईतील एक मोठा अंमली पदार्थ तस्कर असून हा थेट शौविकच्या संपर्कात होता. तो वांद्रे याठिकाणचा होता. जैदने अनेकदा शौविकला अंमली पदार्थांची डिलीव्हरी केल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे NCB ला शंका आहे की रिया देखील शौविककडून अंमली पदार्थ घेत असावी. या घटनांनंतर रियाच्या आधी शौविक चक्रवर्तीला NCB लवकरच ताब्यात घेणार आहे अस बोलले जात आहे. जैदकडून 17 मार्च 2020 या दिवशी शौविकने अंमली पदार्थ घेतले होते, असे समोर आले आहे.

तर याच अंमली पदार्थ प्रकरणी NCBने आज पहाटे बशीद परिहार नावाच्या एका 20 वर्षीय तरुणाला देखील अटक करण्यात आली आहे. हा तोच बशीद आहे ज्याने जैदची ओळख शोविकशी करुन दिली होती. बशीद आणि शौविकचे खास संबंध असून शौविक, बशीद आणि जैद अशी तिघांची जोडी होती

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार