सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मोठा खुलासा; राज कुंद्रा या कंपनीसाठी करत होता पॉर्नोग्राफी

पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत.

Sudarshan MH
  • Jul 21 2021 10:43AM

मुंबई पोलिसांनी मुलींना फसवून पॉर्न चित्रपट तयार करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा याचं नाव देखील समोर आलं आहे. परिणामी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला अटक झाल्यापासून या प्रकरणात सतत नवनवे खुलासे होत आहेत. दरम्यान पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार राजची कंपनी लंडनमधील एका चित्रपट कंपनीसाठी या पॉर्नपटांची निर्मिती करत होती.

वरिष्ट पोलीस अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिलेल्या माहितीनुसार राजच्या वियान इंडस्ट्रीज या कंपनीचे संबंध लंडनमधील केनरिन या कंपनीसोबत आहेत. ही कंपनी हॉटशॉट नावाचं एक अप चालवते. या अपवरील सामुग्रीसाठी राज कुंद्रा त्यांना मदत करतो. पोलिसांच्या हाती काही वॉट्सअप चॅट आणि इमेल्स लागले आहेत. अन् या पुराव्यांच्या आधारावरच त्याला अटक करण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाची आणखी चौकशी करत आहेत

फेब्रुवारी महिन्यात मुंबई पोलिसांच्या एका पथकाने मढ येथील ग्रीन पार्क बंगलोवर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार