सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शोले सिनेमातील सुरमा भोपालींचं निधन

वयाच्या 81 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jul 9 2020 9:46AM

बॉलावूड क्षेत्रामध्ये आणखी एका अभिनेत्याचं निधन झालं आहे. शोले या सगळ्यात गाजलेल्या सिनेमातील सुरमा भोपाली म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता जगदीप यांचं निधन झालं आहे. वयाच्या 81 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डायरेक्टर अनुभव सिन्हा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे. जगदीप यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्यांच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. ‘शोले’ चित्रपटातील सूरमा भोपालीच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याचं खरं नाव सय्यद इश्तियाक जाफरी आहे. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता जावेद जाफरी हा जगदीपचा यांचा मुलगा आहे.

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी ब्रिटिश इंडिया इथे दतिया सेंट्रल प्रोव्हिंगमध्ये झाला. त्यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण 1994 च्या 'अंदाज अपना अपना', 1975 मधील 'शोले' आणि 1972 मधील 'अपना देश' मधील त्यांच्या अभिनयाने चाहत्यांमध्ये त्यांची एक वेगळीच छाप होती.

 

 

 

1951मध्ये बालकलाकार म्हणून जगदीप यांनी 'अफसाना' चित्रपटाद्वारे सिने जगतात प्रवेश केला आणि कॉमेडियन म्हणून त्यांनी 'दो बिघा ज़मीन' या सिनेमातून पदार्पण केले. आज त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार