सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सारा अली खानचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह

अभिनेत्री सारा अली खान हिने सोमवारी एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना अशी माहिती दिली आहे की, तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

Aishwarya Dubey
  • Jul 14 2020 10:42AM

महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. आता अभिनेत्री सारा अली खान (Sara Ani Khan) हिने सोमवारी एक पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना अशी माहिती दिली आहे की, तिचा ड्रायव्हर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सोमवारी उशीरा रात्री तिने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ड्रायव्हरचा रिपोर्ट येताच तात्काळ त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याबाबत मुंबई महापालिकेला (BMC) ला माहिती देण्यात आली आहे.

सारा अली खानने यामध्ये अशी माहिती दिली आहे की, यामध्ये तिच्या परिवारातील सदस्यांचे आणि घरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचे रिपोर्ट नेगिटिव्ह आले आहेत. त्याचप्रमाणे सर्व खबरदारी बाळगण्यात येत असल्याचे यावेळी साराने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

30 जून रोजी सारा अली खान मुंबईमध्ये काही फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली होती. मुंबईतील चित्रपट निर्माते आनंद एल राय यांच्या ऑफिसबाहेर सारा दिसली होती. सारा त्यांच्या बरोबर तिचा नवीन चित्रपट 'अतरंगी रे' मध्ये काम करणार आहे. यामध्ये ती धनुष आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर काम करणार आहे.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास सारा अली खान लवकरच वरूण धवनबरोबर 'कुली नं 1' मध्ये दिसणार आहे. दरम्यान या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप निश्चित नाही आहे

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार