सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जेष्ठ पौर्णिमेचे छायाकल्प चंद्रग्रहण

सामान्य बुद्धि आणि सामान्य जनजीवनाच्या रहाटगाडग्यात ग्रहण म्हटलं की ठळक सूर्य आणि चंद्रग्रहणाची स्थिती डोळ्यापुढे उभी राहते. मात्र आपण आज जाणून घेणार आहोत छायाकल्प चंद्र ग्रहणा विषयी ...

Snehal Joshi
  • Jun 6 2020 10:18AM
सामान्य बुद्धि आणि सामान्य जनजीवनाच्या रहाटगाडग्यात ग्रहण म्हटलं की ठळक सूर्य आणि चंद्रग्रहणाची स्थिती डोळ्यापुढे उभी राहते. मात्र आपण आज जाणून घेणार आहोत छायाकल्प चंद्र ग्रहणा विषयी ...

ज्यावेळी चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेमध्ये येत. त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात.

चंद्र आणि सूर्याच्या मध्ये पृथ्वी आल्यावर चंद्रग्रहण बघता येते. एरवी पृथ्वीची गडद छाया चंद्रावर पडत असल्याने ते खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असते. पण, जेव्हा चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून प्रवास करतो तेव्हा त्या ग्रहणाला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. तर याच चंद्रग्रहणाला मांद्य चंद्रग्रहण असेही एक नाव आहे.पण हे  ग्रहण म्लान किंवा कमी तेजस्वी आहे. 

नेहमीच्या चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेत आल्याने काळसर तपकिरी दिसत असतो . परंतु, छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र फक्त म्लान किंवा कमी तेजस्वी दिसतो. म्हणून त्याला मांद्य चंद्रग्रहणही म्हणतात. पण, काल  शुक्रवारी चंद्र पृथ्वीच्या जवळ असल्याने तो फार म्लान किंवा मंद दिसला नाही.

ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच शुक्रवार ५ जून रोजी छायाकल्प चंद्रग्रहण झाले . या दिवशी रात्री ११ वाजून १६ मिनिटांनी चंद्रग्रहणाला सुरुवात झाली  आणि मध्यरात्री २ वाजून ३४ मिनिटांनी चंद्रग्रहण सुटले . हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसले . या चंद्रग्रहणात मोठा विशेष फरक पडणार नाही, असे सांगितले जात आहे. चंद्र आपल्या संपूर्ण आकारात दिसले . या चंद्रग्रहणावेळी चंद्र वृश्चिक राशीत विराजमान होते .

 सामान्य बुद्धीचा  प्रश्न ग्रहणातील दानाचे महत्त्व असतं का?

चंद्रग्रहणापूर्वी किंवा त्यानंतर केलेले दान अधिक लाभदायक असल्याची धर्मशास्त्रांत मान्यता आहे. चंद्रग्रहणाच्या काळात दान केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि आपल्या कुलदैवतांचे आशीर्वाद लाभतात, असे मानले जाते. चंद्रग्रहणात चांदी दान करण्यास प्रचंड महत्त्व आहे. चांदी दान केल्याने मन मजबूत होते आणि बुद्धी कुशाग्र होते, असे म्हटले जाते. म्हणूनच ग्रहण काळात चांदीची नाणी, मूर्ती आणि भांडी दान केली जातात. चंद्राचा संबंध दूध आणि दह्याशी असल्याने दूध आणि दह्याचे दान केले जाते. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान नारायणाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.

सूर्यग्रहण पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागते पण चंद्रग्रहण हे उघड्या डोळ्यांनी पाहता येतं. असे  तज्ज्ञ सांगतात.
हे चंद्रग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या खंडात दिसले  आहे.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार