सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी वक्तव्य केलं

सोमवारी पार पडली काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक

Aishwarya Dubey
  • Aug 25 2020 10:07AM

काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चच्रेनंतर घेण्यात आला. करोनास्थिती निवळल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अधिवेशन बोलावले जाणार असून, त्यात नव्या अध्यक्षाची निवड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिंदबरम यांनी यासंदर्भात वक्तव्य केलं. पुढील तीन-चार महिन्यांमध्ये ‘ऑल इंडिया काँग्रेस कमिटी’च्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यानंतर काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाचीही निवड केली जाणार असल्याचे ते म्हणाले. सोमवारी काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत याविषयावर भाष्य केलं.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वासाठी गांधी कुटुंबीयांशिवाय अन्य कोणी नाही का? असा सवाल चिदंबरम यांना यावेळी करण्यात आला. “आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला आणि त्यानंतर यातून बाहेर निघण्याचा एक मार्ग शोधला. करोना महामारीच्या या काळात आम्ही काही महिन्यांचा वेळ मिळवला आहे,” असं ते या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे सक्रीय नाहीत ही बाब चुकीची आहे. राहुल गांधी पक्षात सक्रीय आहेत. सध्या करोना महामारी सुरू आहे आणि म्हणूनच सोनिया गांधी लोकांमध्ये सक्रीय दिसत नाही. त्यांच्या प्रकृतीसाठी ते योग्य नसल्याचं मत चिदंबरम यांनी राहुल गांधी आणि सोनिया गांधी सक्रिय नसल्याबाबत विचालेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केलं. “२००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला अशाच प्रकारे पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भाजपावर अशी टीका झाली नव्हती. तर काँग्रेसवर आता अशा प्रकारे का टीका करण्यात येत आहे. माध्यमांना आता भाजपाला प्रश्न विचारले पाहिजेत. परंतु ते काँग्रेसला प्रश्न विचारत आहे. माध्यमांनी कोणाच्याही एकाच्या बाजूनं असू नये त्यांनी विरोधी पक्षांचा आवाज बनलं पाहिजे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

अध्यक्ष निवडीचा अधिकार काँग्रेसचाच

यावेळी त्यांना निवडणुकीत झालेल्या पराभवाबाबतही सवाल करण्यात आला. “निवडणुकीतील पराभवानंतर आम्ही आत्मपरिक्षण केलं. आम्ही आमच्या कमतरतांवरही चर्चा केली. भारत बचाओ रॅली त्याचं उत्तम उदाहरण आहे. ती रॅली यशस्वी ठरली. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आहेत तेव्हा आम्ही हिंदी भाषिक प्रदेशातील तीन विधानसभा निवडणुका जिंकल्या. परंतु भाजपाच्या कारस्थानांमुळे त्या ठिकाणचं आमचं सरकार पडलं ही निराळी बाब आहे,” असंही चिदंबरम म्हणाले. तसंच पक्षाचा अध्यक्ष कोण असावा हा काँग्रेसचा अधिकार आहे. एका वर्षासाठी सोनिया गांधी यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु करोना महामारीमुळे सध्या निवडणुका घेतल्या जाऊ शकत नाही. परंतु काँग्रेसमध्ये सर्वांनाच निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि येणाऱ्या काळात निवडणुका पार पडणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार