सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ

देशभरात आज पुन्हा एकदा इंधनाच्या दरात झाली वाढ

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 24 2020 8:57AM

देशभरात आज (बुधवार) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील चार महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरात १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर हा ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर ७७.४९ रुपये इतका झाला आहे.

 

आजच्या दरवाढीनुसार, दिल्ली (पेट्रोल – ७९.७६, डिझेल -७९.८८), मुंबई (पेट्रोल – ८६.५४, डिझेल-७७.७६), चेन्नई (पेट्रोल – ८३.०४, डिझेल-७६.७७), कोलकाता (पेट्रोल – ८१.४५, डिझेल-७४.६३) इंधनाचा दर आहे. इतिहासात पहिल्यांदाच दिल्लीत पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे.

भारतात आता पेट्रोल-डिझेलच्या सुधारित किंमती दररोज सकाळी ६ वाजता जाहीर होतात. जागतिक स्तरावर तेलाच्या किंमती या मिनिटामिनिटाला बदलत असतात. त्याचा थेट परिणाम इंधनाचे वापरकर्ते आणि डिलर्स यांच्या खरेदी किंमतीत होत असतो. भारतातील या इंधनाच्या किंमतींमध्ये उत्पादन शुल्क, व्हॅट, डिलर्सचं कमिशन या बाबींचा समावेश असतो. राज्यांप्रमाणे या करांमध्ये बदल होत असल्याने इंधनाच्या दरांतही बदल दिसून येतात. हे तीनही कर पेट्रोल-डिझेलच्या मूळ दरात समाविष्ट झाल्याने त्यांची किरकोळ विक्रीची किंमत जवळपास दुप्पट होते. त्याचबरोबर रुपयाच्या मुल्याचा डॉलरच्या तुलनेत झालेला बदलही इंधनाच्या किंमतींवर परिणाम होतो. त्यामुळे डॉलरच्या दरात आंतराष्ट्रीय स्तरावर इंधनाचा दर वाढल्यास भारतातही इंधनाच्या दरात वाढ होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार