सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गौतम गंभीरला ‘ISIS काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

गंभीरने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनीच एएनआयशी बोलताना दिलीय.

Sudarshan MH
  • Nov 24 2021 11:12AM

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्ली मतदारसंघाचा आमदार असणाऱ्या गौतम गंभीरला जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. गंभीरनेच यासंदर्भातील तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे या प्रकरणाचा खुलासा झालाय. गंभीरने तक्रार केल्याचा खुलासा पोलिसांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केलाय.

दिल्ली मध्यच्या पोलीस उपायुक्त श्वेता चौहान यांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरने जीवे मारण्याची धमकी आल्यासंदर्भात तक्रार नोंदवलीय. “भाजपाचे पूर्व दिल्लीचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांनी दिल्ली पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना आयएसआयएस काश्मीरकडून जीवे मारण्याची धमी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये आम्ही तपास करत आहोत. तसेच गौतम गंभीर यांच्या निवासस्थानाबाहेरील सुरक्षा आम्ही वाढवली आहे,” असं श्वेता यांनी सांगितलं

गंभीरच्या कार्यालयामधून यासंदर्भातील एक पत्र पोलिसांना पाठवण्यात आलाय. या पत्रामधील मजकुरानुसार गंभीरला त्याच्या ई-मेलवरुन ही धमकी देण्यात आलीय. २३ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री ९ वाजून ३२ मिनिटांनी आलेल्या एका ई-मेलमध्ये खसदार गौतम गंभीर आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून तपास करावा, असं पत्रात म्हटलं आहे.

गौतम गंभीर हा भारताचा माजी क्रिकेटपटू असून सध्या तो पूर्व दिल्ली मतदारसंघामधून भाजपाचा खासदार आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये तो या मदतारसंघातून निवडून आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार