सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत

रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध गंभीर आरोप

Aishwarya Dubey
  • Aug 6 2020 10:03AM

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput Suicide) कथित आत्महत्या प्रकरणात आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात CBI च्या चौकशीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. याबाबत नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहेत.

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, केंद्र सरकारकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सांगितलं की, बिहार सरकारने या प्रकरणाची CBI चौकशीची शिफारस केली होती. केंद्राने बिहार सरकारची शिफारस मान्य केली आहे. आता या प्रकरणाची चौकशी CBI करणार आहे.

 

दुसरीकडे, सुप्रीम कोर्टात बुधवारी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकार चौकशीचा अहवा तीन दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यात सर्व बाजू आपल्या लेखी उत्तरांत देण्याचे कोर्टानं आदेश दिले आहेत. यानंतर सर्वोच्च न्यायालय आपला निर्णय देईल. कोण चौकशी करेल आणि कुठले राज्य करणार यावर निर्णय देईल.

रिया चक्रवर्तीसह 6 जणांवर गुन्हा...

सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी (वय-74) यांनी 28 जुलैला अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचे कुटुंबीय अशा सहा जणांविरुद्ध पाटणा येथील राजीव नगर पोलीसमध्ये एफआयआर नोंदवली आहे. सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा ठपका रिया चक्रवर्तीवर ठेवण्यात आला आहे. केके सिंह यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बिहार पोलीस या प्रकरणी चौकशीसाठी मुंबईत दाखल झाले होते. मात्र, बिहार सरकारने केंद्र सरकारकडे या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. रियाने आपलं करिअर घडवण्यासाठीच मे 2019 सुशांतशी मैत्री केली होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार