सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठी पत्रकारितेची पायाभरणी करणारे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची जयंती ‘पत्रकार दिन’ म्हणुन राज्यभरात साजरी होते

Abhimanyu
  • Jan 6 2021 1:14PM

६ जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची जयंती पत्रकार दिन म्हणुन राज्यभरात साजरी होत आहे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पणहे ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले होते.  ६ जानेवारी हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

 

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्व म्हणून देशात विख्यात होते. बालपणी घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केलेल्या आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी सन १८२५ मध्ये मुंबई येथे सदाशिवबापू छत्रे आणि बापूशास्त्री शुक्ल यांच्याकडून संस्कृत आणि इंग्रजीचे शिक्षण घेतले. गणित आणि आधुनिक विज्ञान या विषयातही ते पारंगत होते. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांची एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय व्याख्याते म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. याच बरोबर जांभेकरांना

रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र अशा विविध विषयांचे ज्ञान होते.

 

एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये अध्यापन करीत असताना आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना समाजीतील अनेक समस्या दिसून येत. पारतंत्र्य, अनिष्ट रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्य्र, अंध:श्रद्धा होणार्‍या समाजाच्या अधोगतीमुळे त्यांना चिंता वाटत असे. या सर्व समस्यांमधून मार्ग दाखविण्यासाठी जांभेकरांनी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणहे वृत्तपत्र सुरू केले.

जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने दर्पणवृत्तपत्र आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. दर्पणला सुरुवातीला मोठ्या संख्येने वर्गणीदार मिळाले नाहीत. मात्र, ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवृत्तपत्र साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार