सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

BREAKING : मंदिरातच 3 पुजाऱ्यांची हत्या

सकाळी जेव्हा स्थानिक लोकांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं. त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला.

Aishwarya Dubey
  • Sep 11 2020 7:34PM

कर्नाटकमधल्या मंड्यामध्ये एका मंदिरातल्या 3 पुजाऱ्यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. इथल्या अराकेश्वर मंदिरात ही घटना घडली. गुरूवारी पहाटे मंदिरात दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि झोपलेल्या पुजाऱ्यांची हत्या केली. त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या दानपेट्याही पळवून नेल्या आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन पथकं स्थापन केली आहेत.

हे मंदिर इथलं प्रसिद्ध मंदिर आहे. कोरोनामुळे पुजारी हे मंदिरातच झोपत होते. या मंदिराचा कारभार हा सरकारकडे आहे. पहाटे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान दरोडेखोर आले होते. 3 पेक्षा त्यांची संख्या जास्त असावी. त्यांनी झोपलेल्या पुजाऱ्यांवर शस्त्रांनी वार करून हत्या केली अशी माहीती पोलिसांनी दिली आहे.

त्यानंतर त्यांनी मंदिरातल्या तीन मोठ्या दानपेट्या पळवून नेल्या. मंदिराबाहेर त्या फोडून त्यातले पैसे लंपास केले अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. सकाळी जेव्हा स्थानिक लोकांना मंदिराची दारं उघडी दिसली तेव्हा त्यांनी आतमध्ये जाऊन पाहिलं.

त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसला. तीन पुजारी मृतावस्थेत आढळून आलेत. मंदिराच्या गर्भगृहातही दरोडेखोरांनी तोडफोड केली होती. दानपेट्या पळविण्यासाठी त्यांनी तोडफोड केली असावी असंही पोलिसांनी सांगितलं. मंदिरच्या सुरक्षेविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे

पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवावी आणि विश्वास निर्माण करावा अशी मागणी होत आहे. शहरातल्या इतर मंदिरांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही पोलीस आढावा घेत असून सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार