सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

एलसीबी ची चिखली मधील धाडीत घडला चमत्कार ; काही तासातच लाखो रुपयांचा प्रतिबंधित गुटका अचानक काही हजारांचाच झाला...

राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाकू साठवणूक करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे वारंवार संकेत दिलेत

Sudarshan MH
  • Aug 27 2021 10:54AM
बुलढाणा : राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी राज्यात प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाकू साठवणूक करून अवैधरित्या विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे वारंवार संकेत दिलेत. त्यानुसार जिल्ह्यासह राज्यात मोठ्या प्रमाणत यावर कारवाही सुद्धा करण्यात आल्यात. मात्र पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यात अवघ्या काही तासातच लाखो रुपयांचा गुटखा आणि सुगंधित तंबाखू अचानक काही हजार रुपयांचा कसा काय होऊन जातो हेच कळायला मार्ग नाही.

दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी एलसीबी बुलढाणा ने "चिखली शहरात शासन प्रतीबंधीत गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्या दुकानावर धाड, स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन चिखलीची संयुक्तिक कारवाई" या मथळ्याखाली प्रेसनोट सर्व मीडिया हाऊसच्या प्रतिनिधींना पाठवलीत. या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आज दिनांक २३/८/२०२१ रोजी स्था.गु.शा बुलढाणाचे पोलीस निरीक्षक गीते व पोलीस स्टेशन चिखलीचे ठाणेदार गुलाबराव वाघ यांचे मार्गदर्शनात चिखली शहरात स्थागुशा बुलढाणा येथिल सपोनि विजय मोरे, पो.कॉ. नदीम, चिखली पो. स्टे. येथील नापोकॉ पुरुषोत्तम आघाव, पो.कॉ. उमेश राजपूत आणि चालक शेख नदीम यांनी माहिती काढून चिखली शहरात शासन प्रतिबंधित गुटखा साठवणूक व विक्री करणाऱ्या दुकानावर छापा कारवाही दरम्यान एकूण ५१ हजार १९० रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तत्सम पदार्थ जप्त करण्यात आला.

इथपर्यंत सर्व ठीक आहे, परंतु केजीएन पान मसाला या दुकानासमोर विदर्भ मेडिकलला लागून असलेल्या गोडावून मधील मालाचे काय झाले? तिथे सुद्धा झडती घेण्यात आली होती न..? आणि तिथे बराच म्हणजे अंदाजे लाख रुपयांपेक्षा अधिकचा माल एलसीबीच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी शोधून काढला, परंतु तपास अधिकारी यांना तो माल प्रतिबंधित का बरं वाटले नाही ? याबाबत शंका निर्माण होत आहे. याप्रकारची अर्धी माहिती, अर्ध्याहुन कमी माल हस्तगत केल्याचे बनाव करणे, आणि मूळ किंमत लपवणे यामागील हेतू काय ? याबाबत अजूनही स्पष्ट झालेले नाही.
जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः राज्याचे अन्न व औषधी विभागाचे मंत्री सुद्धा आहेत. आणि त्यांच्याच जिल्ह्यात त्यांच्या शब्दांना हडताळ फासल्या जात असल्याची प्रतिक्रिया आता समोर येऊ लागली आहे. पोलीस स्टेशन परिसरच्या हाकेच्या अंतरावर आणि पोलीस चौकीच्या काखेजवळच प्रतिबंधित गुटखा, पान मसाला, स्वीट सुपारी, सुगंधित तंबाखू वगैरे वगैरेची साठवणूक आणि मोठ्या प्रमाणावर विक्री होतच आलेली आहे. आणि त्यातही अधून मधून जर एखादी कारवाही झालीच तर त्याचा गवागवा मोठ्या प्रमाणावर होतो. कालच्या कारवाहिनंतर मंत्री महोदयांना कारवाही केल्याचे रिपोर्ट करून शाबासकी सुद्धा मिळवली असेल, परंतु या थापेला आता काहीच किंमत उरली नसून सरळ सरळ मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेकच केल्या गेली आहे. या प्रकारानंतर सामान्यजनांनाही प्रश्न पडला आहे की, नेमकी माशी कुंठे शिंकली, आणि का.?

सदर गोडावून मध्ये बाबा ब्लॅक १२० सुगंधित तंबाखू, मिराज, चंचल, गुगल, नखराली आदींचा फार मोठा साठा म्हणजे जप्त करण्यात आलेल्या माल पेक्षा कदाचित ते दुप्पट पेक्षा जास्त आणि किंमतीतही महाग असे होते. परंतु तो माल ताब्यात का बरं घेण्यात आला नाही ? सदर प्रकरणाबाबत आता मंत्री महोदय आणि वरिष्ठ अधिकारी यांची काय भूमिका असणार हे बघण्यासारखे असणार.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार